Bigg Boss OTT 2 Nomination  Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: पहिलं नॉमिनेशन पडलं पार! घरात येताच 'या' चार सदस्यांवर टांगती तलवार..

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2 Nomination: मनोरंजन विश्वातील सर्वात वादग्रस्त आणि आणि तितकाच लकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा ओटीटी वरील दुसरी सीझन सध्या नुकताच सुरू झाला आहे.

हा सीझन पहिल्या सिझन पेक्षा खुपच वेगळा असणार आहे आणि याची झलक प्रेक्षकांना पहिल्याच दिवशी आली.

रॉकस्टार पुनित याने घरता येताच तुफान राडा सुरु केला याचा परिणाम त्याला घराबाहेर काढण्यात आल. यावेळी सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करत असल्याने तो देखील चर्चेत आहे.

17 जून रोजी मोठ्या धमाकेदार पद्धतिने हा शोला सुरवात झाली. आता बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांना धक्का देत या पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पुर्ण केले आहे.

नुकतच निर्मात्यांनी बिग बॉस ओटीटी 2 च्या पुढिल एपिसोड एक प्रोमो

सोशल मिडियावर शेयर केला आहे. प्रत्येक स्पर्धकाला स्वतःला वाचवण्यासाठी नॉमिनेशन करत एका स्पर्धकाचे नाव सांगावे लागते.

सर्व स्पर्धक आपापली कारणे सांगत एकमेकांना नॉमिनेट करत असतात.

पहिल्या आठवड्यासाठी चार स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे मिडिया रोपोर्टनुसार, यामध्ये बाबिका धुर्वे, जिया शंकर, पलक पुरस्वानी आणि अविनाश सचदेव यांच्या नावाचा सामावेश आहे.

पलकने नुकतीच खूप प्रयत्नांनंतर घरात एन्ट्री मिळाली होती मात्र आता पुन्हा तिच्यावर नॉमिनेशनची तलवार आली आहे.

बिग बॉस ओटीटी सीझन 2 आता पूजा भट्ट, सायरस ब्रोचा, फलक नाझ, मनीषा राणी, जद हदीद , आलिया सिद्दीकी आणि अभिषेक मल्हान हे सुरक्षीत आहेत.

Jio सिनेमावर तुम्हाला हा शो फ्रिमध्ये पाहता येइल. चाहते 24 तासांच्या लाईव्ह फीडमध्ये शो देखील पाहू शकतात.

प्रकाश कुमार उर्फ ​​पुनीत सुपरस्टारला त्याच्या असभ्य वर्तनासाठी आणि बिग बॉसच्या मालमत्तेची नासधूस केल्यामुळे काही तासांतच घरातून काढून टाकण्यात आलं आहे.

त्यांमुळे आता आधिच एक स्पर्धक बाहेर गेल्यामुळे या आठवड्यात कुणालाही घराबाहेर काढलं जाणार नाही अशा चर्चाही सुरु आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT