Bigg Boss OTT 2 Old friends Palak Purswani and Jiya Shankar confronted each other on Tuesday's episode viral  Esakla
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: जियाच्या एक्स बॉयफ्रेंडवरुन तिच्यात अन् पलकमध्ये चांगलच वाजलं...

Vaishali Patil

'बिग बॉस ओटीटी'चा सीझन 2 नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सलमान खानच्या या शोमध्ये टीव्ही, बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी घरात बंद झाले आहे.

मात्र आता घरात गेल्यानंतर स्पर्धकांनी आता त्याचे घरे रंग दाखवण्यासाठी सूरुवात केली आहे. मनोरंजनासोबतच ते आता वादविवादही सुरु झाले आहे. तर काही स्पर्धकांमध्ये मैत्रीही झाली तर काहींचे खटके उडाले आहे.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये घटस्फोटीत जोडपं अविनाश सचदेव आणि पलक पुरस्वानी यांनी देखील एकत्र घरात एंट्री केली आहे. त्याचबरोबर पलक पुरस्वानी आणि जिया शंकर या चांगल्या मैत्रिणी आहेत.


पलक जियाला कधीच बोलू देत नसल्यामुळे त्याची मैत्री तुटली असं जिया तिला सांगते. मात्र हे ऐकल्यानंतर पलक चिडते आणि जियाला बोलायला लावते.

जिया म्हणाली की, "आताही तू मला बोलू देत नाहीस, अजिबात ऐकत नाहीस . तू माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आली होतीस, पण तू जाऊन दुसऱ्या लोकांसोबत बसलीस. त्यांच्यासोबत पार्टी करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत. तो माझा वाढदिवस होता पण माझ्यासाठी तु एकही वाढदिवसाची शुभेच्छा किंवा पोस्ट टाकली नव्हती."

जिया पुढे म्हणते की, "ही खूप छोटी आणि शुल्लक गोष्ट आहे पण ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे कारण तू माझी खुप चांगली मैत्रिण आहेस आणि मी तुझ्यासाठी ते करेन. मला यामुळे खूप दुख झाले. माझ्या वाढदिवशी तु अशी वागली?"

यावर स्पष्टीकरण देतांना पलक म्हणते की, "मला असं वाटलं की मी तुला त्या पार्टीत नको होती. मला तुझ्याकडून तिच प्रतिक्रिया मिळाली." त्यामुळे तु मला ते विचारायला हवं होत असं तिला जिया म्हणते.

मात्र यानंतर जियानं दुसऱ्या विषयावर बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली की, माझा ब्रेकअप झाला आणि तू त्या व्यक्तीला प्रत्येक पार्टीत, सगळीकडे बोलवत होतीस हे इतकं अचानक आधी तो मला नाही दिसला कुठे...'

यानंतर पलक म्हणाली की जियाने तिला तिच्या चिंता आणि समस्यांबद्दल बोलायला हवं होतं. त्यावर जियाने दावा देखील केला की तिने तसे केले. त्यानंतर जिया पुढे म्हणाली की, "हे मला खूप त्रासदायक होते."

त्यानंतर पलक म्हणते की तिनेही विचार केला आणि जे झालं ते झालं आता ती ही थकली आहे. असं म्हणत पलकने ही चर्चा संपवली. त्यामुळे आता बिग बॉसमध्ये या दोघांची तुटलेली मैत्री पुन्हा होईल का आणि बिग बॉस त्यासाठी काय प्लॅन करणार हे पाहणे उत्सूकतेचे ठरेल ..

बिग बॉस OTT 2, सलमान खानने होस्ट करत असून 17 जून रोजी प्रीमियर झाला आणि Jio सिनेमा आणि Voot Select वर कधीही फ्रिमध्ये पाहिला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT