bigg boss ott fame abhishek malhan 1.5 lakh stolen while he travel SAKAL
मनोरंजन

Abhishek Malhan: आयफोन गिफ्ट करण्यासाठी लाखभर रुपये बॅगेत, पण प्रवासात... अभिषेकचा धक्कादायक अनुभव

बिग बॉस फेम अभिषेक मल्हानला प्रवास करताना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलंय

Devendra Jadhav

Abhishek Malhan News: अभिषेक मल्हान सर्वांना आठवत असेलच. अलीकडेच बिग बॉस ओटीटी 2 दरम्यान अभिषेक चर्चेत होता. या पर्वात अभिषेकने उपविजेतेपद पटकावलं.

परंतु आता अभिषेकच्या बाबतीत धक्कादायक गोष्ट घडलीय. अभिषेकने प्रवास करताना सोबत लाखभर रुपयांची कॅश बाळगली होती. परंतु अभिषेकला प्रवास करताना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलंय.

(bigg boss ott fame abhishek malhan news)

अभिषेकजवळ होते लाखभर रुपये, मग पुढे घडलं असं काही की...

बिग बॉस फेम अभिषेक मल्हानने प्रवासात दीड लाख रुपये बाळगले होते. अभिषेकने सांगितले की, तो मुलाखतीसाठी जात असताना प्रवासादरम्यान त्याचे पैसे चोरीला गेले.

अभिषेकने खुलासा केला की, तो आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या रोख रकमेसह प्रवास करत होता. दीड लाख रुपये चोरी झाल्याने त्याला अस्वस्थ वाटत आहे

आयफोन गिफ्ट करायचा होता पण...

अभिषेकच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणालातरी आयफोन गिफ्ट करायचा होता. त्यामुळे अभिषेकने प्रवासात पैसे बाळगले होते. परंतु ते पैसे त्याच्या नकळत चोरीला गेले आहेत. त्यामुळे अभिषेकला मोठा धक्का बसलाय.

अभिषेकला आली वडिलांची आठवण

अभिषेकला यावेळी त्याच्या वडिलांची आठवण आली. त्याने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याला हजारो वेळा पैशाची काळजी घेण्यास सांगितले होते, परंतु तरीही त्याने गमावले.

अभिषेक म्हणाला, "मला कधीच वाटलं नव्हतं की मला अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल. ही खूप भीतीदायक गोष्ट आहे आणि या प्रकरणात पुढे काय करावं हे मला समजत नाही."

दरम्यान कमेंटच्या माध्यमातुन अभिषेकच्या फॅन्सने त्याला धीर दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: नवीन जल योजना ; चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मेनहोलचे काम पूर्ण; नक्षत्रवाडीत आज सायंकाळपर्यंत पाणी

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात खास मोड्यूल अन् फंडिंग? केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी

SCROLL FOR NEXT