bijay anand 
मनोरंजन

'हा सर्वांत मोठा घोटाळा'; विजय आनंद यांचा कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यास नकार

"माझ्यासाठी माझं शरीर हे मंदिर आहे आणि..."

स्वाती वेमूल

एकीकडे अनेक सेलिब्रिटी हे कोरोनाप्रतिबंधक लस Vaccine घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करत असताना दुसरीकडे अभिनेते विजय आनंद Bijay J Anand यांनी लस कधीच घेणार नसल्याचं म्हटलंय. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं जगभरातील देशांनी मान्य केलं. देशातही वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्याविषयी जनजागृतीसुद्धा करण्यात येत आहे. असं असताना लसीकरण हा खूप मोठा घोटाळा असल्याचा दावा विजय आनंद यांनी केला आहे.

"मी दोन चित्रपट गमावले आहेत, ज्यांची शूटिंग लंडनमध्ये होणार होती. सर्बियामध्ये शूट होणारा मोठा वेब सीरिज प्रोजेक्टसुद्धा मी गमावला. दुबईत मला एका पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, पण मी तिथेही जाऊ शकत नाही. जरी माझ्या हातून काम निघून जात असेल, तरी मी लस टोचून घेणार नाही", असं ते म्हणाले.

विजय आनंद यांचा लसीकरणाला इतका तीव्र विरोध का आहे, याबद्दल ते म्हणाले, "माझ्यासाठी माझं शरीर हे मंदिर आहे आणि त्यात मी कोणत्याच केमिकल्सचा प्रवेश होऊ देणार नाही. मला अभिनयसुद्धा करायचे नाहीये. मी सर्व ऑफर्स नाकारल्या आहेत. माझ्या १४ वर्षांच्या मुलीला चित्रपटात पहिल्यांदा भूमिका मिळाली आहे. माझं आणि पत्नी सोनाली खरेचं लसीकरण झालं नसल्याने तिला एकटीला लंडनला शूटिंगसाठी जावं लागत आहे. लसीकरणाबद्दल आमचा निर्णय ठाम आहे. लसीकरणावरून राजकारण केलं जात असून इतिहासातील हा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असं माझं मत आहे. या घोटाळ्यात मी माझं योगदान अजिबात देणार नाही."

अजय देवगण आणि काजोल यांच्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटात विजय आनंद यांनी भूमिका साकारली होती. अलीकडेच ते 'शेरशाह' या चित्रपटात झळकले होते. विजय हे प्रसिद्ध योग प्रशिक्षक असून जगभरात त्यांचे विद्यार्थी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT