riteish bipasha 
मनोरंजन

हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर संतापले रितेश-बिपाशा

सकाळ वृत्तसेवा

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला असून प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम होताना दिसून येतोय...एकीकडे अनेक दिग्गज यापासून सावधान राहण्याचा सल्ला देतायेत तर दुसरीकडे ज्या लोकांना याचा संसर्ग झालाय ते यावर इलाज करायचा सोडून यापासून पळ काढतायेत...

नुकतीच कोरोना रुग्ण हॉस्पिटलमधून पळाल्याची बातमी आली होती...यावर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री बिपाशा बसू यांनी नाराजी व्यक्त केलीये...त्यांनी रुग्णांच्या या अशा वागण्याला बेजबाबदार म्हणत फटकारलंय...

आतापर्यंत कोरोनामुळे सात हजार लोकांना जीव गमवावा लागलाय..भारतात 144 केसेस समोर आल्या आहेत..त्यातच कोरोना रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेल्याची बातमी आल्याने त्यांच्यापासून अनेक लोकांना हा संसर्ग होण्याची भीती निर्माण झालीये...

यावर संताप व्यक्त करत रितेश देशमुखने आपल्या ट्वीटरवरुन ट्वीट करत या वागण्याला बेजबाबदार म्हटलंय...रितेशचं म्हणणं आहे की, ज्या लोकांना संसर्ग झाला आहे त्यांनी सरकार आणि आरोग्य प्रशासनाला आपल्या वागण्यातून मदत करावी..ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांनी स्वतःला आईसोलेशन मध्ये ठेऊन आपल्या कुटुंबाना आणि मित्रपरिवारला यापासून संसर्ग होण्यापासून वाचवू शकतात..आपण सगळेच एक सैनिक आहोत आणि आपणा सगळ्यांना यासाठी लढावं लागणार आहे..

'तर दूसरीकडे बिपाशा म्हणते, 'लोक इतके अज्ञानी आणि बेजबाबदार कसे असू शकतात? आपण एक जागरूक नागरिक या नात्याने सरकारला या परिस्थितीत हरतऱ्हेने मदत करणं आवश्यक आहे..'

भारतात कोरोनाच्या सगळ्यात जास्त केसेस महाराष्ट्रात आढळून आल्या आहेत..याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये टेलिव्हिजन आणि सिनेमांच्या शूटिंगला 31 मार्च पर्यंत बंदी घालण्यात आलीये..भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 3 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे...

bipashabasu and ritesh deshmukh angry coroner virus patients who run hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT