smriti irani
smriti irani 
मनोरंजन

का लिहिलं स्मृती इराणींनी 'लाल सलाम'?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणून स्मृती इराणींची सुरुवातीला ओळख होती. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. वेगवेगळी मंत्रीपदं भुषवत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्मृती इराणी या त्यांच्या वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. रोखठोक भूमिका, वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी देखील आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री असणाऱ्या इराणी यांनी चक्क कादंबरी लिहिली आहे. त्याचे प्रकाशन नुकतचं पार पडलं आहे.

‘लाल सलाम’ या कादंबरीचे प्रकाशन झालं. त्यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित झाले आहे. वेस्टलँडच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाची प्रेरणा त्यांनी 2010 मध्ये झालेल्या छत्तीसवाड्यातील एका घटनेवरुन घेतली आहे. त्यामध्ये 76 सीआरपीएफचे जवान धारातीर्थी पडले होते. त्यांची हत्या करण्यात आली होती. क्राईम थ्रिलर या प्रकारात मोडणाऱ्या या पुस्तकाची प्रेरणा या 76 जवानांपासून घेतल्याचे त्यांनी सांगितलं आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये वीर सांघवी यांच्यासमवेत झालेल्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये इराणी यांनी पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया प्रेक्षकांना कथन केली.

मी नेहमीच माझ्या अटींवर आयुष्य जगत आले आहे. त्याची किंमतही मला चुकवावी लागली. मात्र आपण त्याबाबत समाधानी आहोत. आयुष्य जसं समोर आलं तसं ते बिनधास्तपणे जगत गेल्याचा आनंद असल्याचेही स्मृती यांनी यावेळी सांगितलं. मला आयुष्यात काही झालं तरी माझ्या अटींशी तडजोड करायची नव्हती. त्यासाठी कितींही मोठी किंमत मोजावी लागली तरी माझी हरकत नव्हती. आणि ते मी केलं. मला काय व्हायचे आहे, काय करायचे आहे याविषयी आपलं ठरलं होतं. त्यानुसार प्लॅन करुन वाटचाल केली. असं मत इराणी यांनी व्यक्त केलं. 2019 मध्ये 43 वर्षीय स्मृती इराणी या मोदींच्या मंत्री मंडळातील सर्वात कमी वय असणाऱ्या महिला मंत्री होत्या. इराणी यांनी लिहिलेली लाल सलाम ही कादंबरी 2010 मध्ये छत्तीसगड येथील दंतवाड्यामध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT