Rashami Desai Esakal
मनोरंजन

Rashami Desai: ट्विटरवरची ब्लू टिक गेली तर रश्मी इलॉन मस्कला आय लव्ह यू चं म्हणाली! ट्विट व्हायरल

Vaishali Patil

सध्या सर्वत्र ट्विटरच्या ब्लू टिकची जोरदार चर्चा सुरू आहे. 21 एप्रिलच्या सकाळीच अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या ट्विटर खात्यांवरून त्यांना व्हेरिफिकेशनसाठी वापरलेली ब्लू टिक काढून टाकण्यात आली.

यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. ट्विटरवर सकाळपासूनच #BlueTick ट्रेंड करत आहे. बी-टाऊनमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तीही यातून सुटू शकल्या नाहीत.

यात अनेक बॉलिवूड कलाकारांपासून तर टीव्ही स्टार्सनी चा देखील सामावेश आहे. यावर अनेकांनी ट्विट केलं आहे. यावर अमिताभ बच्चन यांचीही प्रतिक्रिया खुपच चर्चेत होती. आता त्यातच टिव्हि विश्वातील प्रसिद्ध कलाकर रश्मी देसाईपर्यंत अनेक कलाकार आहेत ज्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींना या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले आहेत तर काहींना याचा आनंद झाला आहे.

वीर दास यांनी ट्विट करत लिहिले की 'मला हे जग आवडते. कलाकाराच्या व्हेरिफिकेशनसाठी तिकीट खरेदी करा, टिक नाही. गुडबाय ब्लू टिक. वीर दास यांनी म्हटले आहे की, जर तुम्ही काही ट्विट केले आणि तुम्हाला ते आवडले तर ते ठीक आहे, जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही म्हणू शकता की हे माझे व्हेरिफाईड खातं नाही. हे खुपच फनी आहे.

त्याचवेळी नर्गिसनेही याबाबत ट्विट केले आहे. तिने लिहिले आहे की,'मी ट्विटरवर फारशी येत नाही, पण माझ्या लक्षात आले की माझ्या अकाउंटमधून ब्लू टिक गायब आहे. ठीक आहे, आतापासून तुम्हाला ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील. कोणी विकत घेईल तर त्याचा उपयोग काय असेल?'

तर छोट्या पडद्यावरिल लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई हिची देखील ब्यू टिक सकाळी गायब झाली. जरी ब्लू टिक जाण्याने अनेक कलाकारांना फारसा फरक पडत नाही. या यादीत अभिनेत्री रश्मी देसाईचाही समावेश आहे.

तिनंही या बद्दल ट्विट करत लिहिलं की, मला या सगळ्या बद्दल खुप छान वाटत आहे. ही सकाळ खुपच सुंदर आहे मला माहित नाही का पण आहे.. इतकच नाही तर रश्मी देसाईने तर इलॉन मस्कला आय लव्ह यू असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT