Rekha
Manish Malhotra
Rekha Manish Malhotra Esakal
मनोरंजन

Rekha: मनीष मल्होत्राची बर्थ डे पार्टी अन् रेखा नवरीसारखी सजली... मग काय चर्चाच रंगली!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने 5 नोव्हेंबरला त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी मनीषने त्याच्या घरी एक मोठी पार्टी दिली, ज्यामध्ये संपूर्ण बॉलिवूडकरी उपस्थित होते. त्याचवेळी या पार्टीचे व्हिडीओ समोर आले आहेत, जे पाहून चाहते आनंदीत झाले आहे. मात्र या पार्टीत मनीषची नव्हे तर रेखाचीच चर्चा जास्त रंगली आहे.

या पार्टीत जवळपास सर्वच बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.सोशल मीडियावर या पार्टीचे काही फोटो शेअर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये रवीना टंडन खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. मात्र रेखा पार्टीत पोहोचली तेव्हा तिचं सुंदर रूप सगळ्यांना भुरळ पाडायला पुरेसे होतं. सर्वात उठून दिसत होती ती एव्हरग्रीन रेखा.

रेखाने या पार्टीसाठी सोनेरी रंगाचा अनारकली कुर्ता निवडला होता. ज्याच्या कुर्त्यात गोल्डन गोटा वर्क केलेलं होतं. तिच्या कुर्त्यावर सोनेरी जरीचे वर्क होते. रेखाने सोनेरी रंगाच्या कुर्त्यासोबत हेवी ज्वेलरी मॅच केली. हेवी सोनेरी कानातले आणि नेकपीस सोबतच रेखाने तिला पूर्णपणे पारंपारिक लूक दिसावा यासाठी मांगटिका देखील घातला होता. त्याचबरोबर कपाळावर टिकली आणी मरून रंगाची डार्क लिपस्टिक लावायली होती आणि केसांचा जूडा बनवला होता. ज्यावर गजरा सुंदर दिसत होता.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

इतकच नाही तर रेखाच्या या सर्व गोल्डन लूकबरोबर तिने उंच टाचांच्या सँडलने सर्वांच लक्ष वेधले. रेखाने या कुर्त्यासोबत मॅचिंग स्ट्रेपी हील्स घातल्या होत्या. ज्यामध्ये टाचांची उंची खूप जास्त होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रेखा अनेकदा पारंपारिक लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधते. यामध्ये ती नेहमीच एव्हरग्रीन दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Latest Marathi Live Updates : आषाढी वारीसाठी 'शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने'नं घेतला पुढाकार

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT