Aamir Khan Esakal
मनोरंजन

Aamir Khan: 'माझ्या वडिलांनी नेहमीच....' आमिर खान पुन्हा का रडला?

सकाळ डिजिटल टीम

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला आमिर खान आज लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करत आहे.आज जरी तो करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरी एक काळ असा होता त्याला खुप आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्याचे वडील जरी चित्रपट निर्माते असले तरी त्याच्या घराची आर्थिक परिस्थीती चांगली नव्हती याचा उल्लेख करत आमिर एका मुलाखतीत भावूक झाला होता.

'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानला त्याचे जुने दिवस आठवले. जेव्हा तो फक्त 10 वर्षांचा होता, तेव्हा कुटुंबाची काय परिस्थिती होती हे सागतांना तो म्हणला की, त्याच्या वडिलांनी एका चित्रपटासाठी व्याजावर कर्ज घेतलं होतं, पण जवळपास आठ वर्षे चित्रपट बनूच शकला नाही. हे सांगतांना अभिनेता भावूक झाला आणि मध्येच मुलाखत सोडून निघून गेला.

नंतर परत आल्यावर त्यांनी सांगितलं की, त्या वेळी ज्या गोष्टी त्यांच्या वडिलांना या परिस्थीत पाहणं सर्वात जास्त त्रासदायक होतं. कारण तो अतिशय साधा माणूस होता. कदाचित त्याला इतक कर्ज घेवु नये याची समजलं नसावं.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

पुढे तो म्हणाला की त्याच्या वडिलांनी काही चित्रपट केले असले तरी त्यांच्याकडे कधीही पैसे नव्हते, 'त्याला आर्थिक अडचणीत पाहून त्रास व्हायचा कारण ज्यांच्याकडून त्याने पैसे घेतले होते त्यांचे त्याला फोन यायचे. 'काय करू, माझ्याकडे पैसे नाहीत' या फोनवरून त्यांचं भांडण सुरू व्हायचं. माझा चित्रपट अडकला आहे, माझ्या कलाकारांना तारखा द्यायला सांगा, मी काय करू.'

आमिरने पुढे म्हणाला की जेव्हा परिस्थिती थोडी सूधारली तेव्हा त्याच्या वडीलांनी सर्वांचे पैसे परत केले, एकदा त्याने महेश भट्ट यांना त्यांचे पैसे परत केले, हे पाहून चित्रपट निर्मात्याला खूप आश्चर्य वाटले कारण त्यांना हे पैसे परत मिळतील हि आशाचं नव्हती. इतक्या आर्थिक अडचणी असतांनाही नेहमीच त्याच्या शाळेची फी भरली जाते. इतकंच नाही तर त्याची आई त्याच्यासाठी लांब पँट विकत घ्यायची आणि जास्त दिवस वापरता यावी म्हणून तळाशी दुमडायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT