बोमन इराणी 
मनोरंजन

'नॉनव्हेज बंद, अल्कोहोल घ्यायचं नाही, कुठं जायचं नाही',कारण...

प्रख्यात अभिनेता बोमन इराणी यांच्या मुलाला कोरोना

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं बॉलीवूडकरांची डोकेदुखी वाढवली आहे. दोन आठवड्यांपूर्वी करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या इतर सेलिब्रेटींनाही कोरोना झाला होता. आता बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेता बोमन इराणी (Boman Irani) यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता कायोज इराणीला Kayoze Irani) कोरोना झाला आहे. कायोज इराणीनं सोशल मीडियावर याविषयीची माहिती पोस्ट केली आहे. (Kayoze Irani COVID-19 Positive)

दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला होता. त्यामध्ये अनेक सेलिब्रेटींना आपला जीव गमवावा लागला होता. दुसरीकडे अनेकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं होतं. अजूनही ती परिस्थिती फारशी बदलेली नाही. त्याचा परिणाम कलाकारांच्या वर्तमान स्थितीवर झाला आहे. त्यांना पैशांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आता कुठे थोड्याफार परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असताना ओमीक्रॉननं डोकं वर काढलं आहे. त्याचा परिणाम दिसु लागला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींना कोरोना झाल्याचे दिसुन आले आहे. आज नोरा फतेही या अभिनेत्रीला देखील कोरोना झाल्याची बातमी सुत्रांनी दिली.

कायोजनं सोशल मीडीयावरुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्यानं आपल्या सोशल मीडियावरुन लिहिलं आहे की, माझी कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता सगळं काही बंद, सेलिब्रेशन देखील बंद, काळजी घ्यावी लागणार आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगु इच्छितो की, तुम्ही काळजी घ्यावी. परिस्थिती चिंताजनक आहे. त्याचा आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT