bollywood actor hrithik roshan saif ali khan in hindi remake southern vikram vedha
bollywood actor hrithik roshan saif ali khan in hindi remake southern vikram vedha 
मनोरंजन

विक्रम वेध चा हिंदी रिमेक, हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - साऊथचे जे सुपरहिट चित्रपट आहेत त्यातील बहुतांशी चित्रपटाचे रिमेक बॉलीवूडनं बनवले आहेत. त्यात अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील. रावडी राठोड, लक्ष्मी, दृष्यम, जर्सी, कबिर सिंग, याशिवाय अनेक चित्रपटांची नावे घेता येतील. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विक्रम वेध नावाचा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता. त्यात आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आता त्या चित्रपटावर हिंदी चित्रपट येणार आहे. ही बॉलीवूडच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. त्यात ऋतिक रोशन आणि सैफ अली खान या दोघांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. टॉलीवूडच्या चित्रपटानं हिंदी चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यावेळी विक्रमवेध चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता.

विक्रम वेध चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. त्याच्या चित्रिकरणाची तारीख समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या दरम्यान या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. ‘विक्रम वेध’ या चित्रपटाबरोबर इतरही काही चित्रपटांमध्ये ऋतिक दिसणार आहे. त्यात दीपिका पादुकोणबरोबरचा ‘फायटर’ ही आहे. तसेच ‘हॉटस्टार’वरच्या एका कार्यक्रमासाठीही त्याला साईन करण्यात आले आहे. वडील राकेश रोशन यांच्या ‘क्रिश ४’ चित्रपटाच्या चित्रीकरणालाही तो याच वर्षी सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ आणि ऋतिक यांची वेगळी केमिस्ट्री वॉर चित्रपटात पाहायला मिळाली होती. तो चित्रपट फारसा लोकप्रिय ठरला नाही. मात्र ऋतिकच्या अभिनय आणि डान्सचे त्यात कौतूक झाले. त्यानंतर ऋतिक आणखी एका अभिनेत्याबरोबर दोन हात करताना दिसणार आहे. अभिनेता सैफ अली खान हा त्याचा विक्रम वेध या चित्रपटात सहकलाकार असणार आहे. ‘विक्रम वेध’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये या दोन मोठय़ा कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  कोरोनाच्या दरम्यान अनेक अभिनेत्यांनी चित्रपटांऐवजी जाहिरातीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. ऋतिकनं तर ब्रँड आणि इतर जाहिरातींसाठी वेळ दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र आता तो त्याच्या वेगवेगळया चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त असणार आहे.

विक्रमवेध च्या हिंदी रिमेकमध्ये ऋतिक हा गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पूर्वतयारीलाही सुरुवात झाली असून या भूमिके साठी हृतिकला मोठय़ा प्रमाणात वजन कमी करावे लागणार आहे. त्याने त्याची तयारीही सुरु केली आहे.  ऋतिकच्या येत्या वर्षातील चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास त्यानं ‘वॉर’नंतर कुठलाही मुव्ही केलेला नाही.  हृतिकने कुठल्याही चित्रपटासाठी करार केलेला नाही. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT