Jacqueline Fernandez, Delhi HC  Esakal
मनोरंजन

Jacqueline Fernandez: जॅकलिनची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात धाव! काय आहे प्रकरण?

जॅकलिन फर्नांडिसने ईडीवरिोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Vaishali Patil

Jacqueline Fernandez : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या चित्रपटापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्तच चर्चेत असते. यासोबतच जॅकलिन फर्नांडिस 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे देखील चर्चेत आहे.

या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून तिची चौकशी सुरु आहे. आता जॅकलीन फर्नांडिसने तिच्यावरील 200 कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंग खटला रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

इडीच्या तक्रारीत आणि त्यांच्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून तिचे नाव देण्याविरोधात जॅकलिनने आता न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात जॅकलिनला फिर्यादी साक्षीदार म्हणून हजर करण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. यावेळी सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल तिला काहीही माहिती नसल्याचे तिने या याचिकेत म्हटले आहे. जॅकलिनने मनी लाँड्रिंगशी जोडण्यात आलेल्या पीएमएलए 2000च्या अंतर्गत कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि ती कुठल्याही गुन्ह्यात सहभागी नव्हती. असे देखील म्हटले आहे.

कॉनमन सुकेश चंद्रशेखर बाबात बोलायचे झाले तर विविध तपास यंत्रणांनी त्याच्यावर 30 हून अधिक आरोप केले आहेत. तुरुंगात असतानाही व्हॉईस मॉड्युलेशन सॉफ्टवेअर आणि स्पूफिंग कॉल वापरून त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

यासोबत अनेक आरोपामुळे सुकेश तुरुंगात आहे. तर या प्रकरणा दरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे त्याच्यासोबतचे काही फोटो समोर आल्यानंतर तिचे नाव सुकेशसोबत जोडले गेले. दोघेही एकमेंकाना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

या सगळ्यातही सुकेश दर महिन्याला जॅकलिन फर्नांडीसला प्रेम पत्र पाठवत असतो. ज्याची सोशल मिडियावर चर्चा होत असते. आता या प्रकरणी तिने कोर्टात धाव घेतल्याने जॅकलिनला या प्रकरणी दिलासा मिळणार की नाही याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: इंग्लंडमध्ये कसोटीतही वैभवची बॅट तळपली; गोलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर ठोकलं वादळी अर्धशतक

Nashik News : ‘दादा’, ‘भाऊ’ची नंबरप्लेट आता महागात; ८१४ वाहनांवर कारवाई

VIRAL VIDEO: 'डॉक्टर, हा साप मला चावला!' चावलेल्या सापाला घेऊन काका पोहचला रुग्णालयात, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Nashik Crime : चार कोटीच्या विम्यासाठी दोन खून, साडेतीन वर्षांनंतर आरोपी जेरबंद

Thane News: मुसळधार पावसात बसून डोंबिवलीकरांचे आंदोलन, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT