मनोरंजन

'तालिबान्यांचं समर्थन कशासाठी करता?' नसरुद्दीन शहा संतापले

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता नसरुद्दीन शहा naseeruddin shah हे प्रख्यात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना rajesh khanna यांच्यावर एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आपल्या मतावर ठाम राहून जे आहे ते त्याला पुराव्याची जोड देत मुद्दा पटवून देण्यात नसरुद्दीन शहा यांचा हातखंडा आहे. ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे कलाकार आहे. आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण त्यांनी तालिबान्यांचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर सडकून टीका केलीय. त्याविषयी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.

काही दिवसांपासून साऱ्या जगाचं लक्ष तालिबान्यांनी वेधून घेतलं होतं. अफगाणिस्तानावर आक्रमण करुन तो देश आता तालिबान्यांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानात एकाधिकारशाही आणि पूर्णत दहशतवादाचे सावट असल्याचे दिसून आले आहे. त्या देशातील दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे त्यांच्याच देशातील नागरिकांना लक्ष्य केलं आहे त्याचे व्हिडिओ साऱ्या जगानं पाहिले आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नसरुद्दीन शहा हे देखील त्यापैकी एक आहेत. त्यांनी तालिबान्यांच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांचे कान टोचले आहेत.

नसरुद्दीन शहा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा सगळीकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भारतातील मुस्लिम हा पूर्णपणे वेगळा आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या सगळ्या जगाला अफगाणिस्तानविषयी सहानुभूती आहे. मात्र काही भारतीय मुस्लिम हे त्या तालिबान्यांचे समर्थन करताना दिसत आहे. हे चूकीचं आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, त्यांना आधुनिक काळाशी सुसंगत असं मुस्लिम तत्वज्ञान हवं आहे की, अराजकीय स्वरुपात सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला बेचिराख करुन टाकणारे विचार हवे आहेत. याचा बारकाईनं विचार करण्याची गरज आहे.

भारतीय मुस्लिम हा जगातील इतर मुस्लिमांपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे. सर्वात शेवटी मी अशी प्रार्थना करतो की, भारतीय मुस्लिम हा कधीही अशाप्रकारच्या बदलाकडे जाता कामा नये. आपण त्याला ओळखू शकणार नाही. इतक्या वेगळया प्रकारानं तो बदलणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अशी प्रतिक्रिया नसरुद्दीन शहा यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT