Rajkumar Rao esakal
मनोरंजन

Rajkumar Rao: अन् मी हिरोच्या रोलसाठी ऑडिशन देणंच बंद केलं! कारण बॉलिवूडमध्ये...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडवर नेहमीच नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. त्यामुळेच आउट साइडर  अभिनेत्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो असंही बोललं जात. त्या अभिनेत्यांच्या यादीत राजकुमार रावच्या नावाचाही सामावेश होतो.

राजकुमार रावने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मात्र त्याचं हे यश त्याला सहजासहजी मिळालेलं नाही.त्यासाठी त्याला कठोर परिश्रम करावे लागलेत. राजकुमार राव याने नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत आयुष्यामध्ये आलेल्या काही अनुभवांबद्दल सांगितले आहे.

राजकुमार राव म्हणाला की, 'माझ्या आयुष्यात अशी एक वेळ आली होती की, मी हिरोच्या रोलसाठी ऑडिशन देणे बंद केले होते. कारण मी जेंव्हा जेंव्हा हिरोच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला जायचो, त्यावेळी मला हिरोच्या मित्राच्या रोलसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला जायचा. मला हे माहितीये की, मी निश्चितपणेच गुडलुकिंग नाहीये. पण दिबाकर बॅनर्जी यांनी माझ्यामध्ये काहीतरी वेगळे बघितले'.

राजकुमारने यापूर्वी देखील सांगितले होते की त्याला त्याच्या दिसण्यावरुन उपहासात्मक गोष्टींबद्दल नकाराचा सामना करावा लागला. तर काहींनी त्याला सांगितले की लीड रोलसाठी त्याची उंची फार कमी आहे. तर इतरांनी त्याच्या शरीराच्या आकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींना माझ्या आयब्रोचा आणि केसांचा देखील प्राॅब्लेम होता. यामुळे मी बरेच दिवस हिरोच्या ऑडिशनसाठी जाणे देखील बंद केले. मात्र त्याने त्याच्या अथक परिश्रम करत स्वप्न सत्यात उतरवले.

राजकुमार रावने ‘रण’ चित्रपटातून न्यूजरीडरच्या भूमिकेतून पदार्पण केले. दिबाकर बॅनर्जीच्या ‘हिट, लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटानंतर तो ओळखला गेला. तो आता नेटफ्लिक्सच्या ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’मध्ये दिसणार आहे, जो 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT