saiprasad 
मनोरंजन

कॅन्सरशी सुरु असलेला लढा अखेरीस संपला, अभिनेता साईप्रसादने अमेरिकेमध्ये घेतला अखेरचा श्वास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 10 ः हिंदी चित्रपट तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे आज अमेरिकेमध्ये सकाळी साडे सातच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. तो 42 वर्षांचा होता. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. साईप्रसाद गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकामध्ये कॅन्सरवर उपचार घेत होता.

साईप्रसाद गेली दोन वर्ष कॅन्सरशी लढा देत होता. 'ग्लायोब्लास्टोमा' म्हणजेच ब्रेन कॅन्सरने त्रस्त होता. आपल्याला कॅन्सरचे निदान झाले आहे कळताच त्याने उपचार घेण्यास सुरुवात केली. त्याचे २२ फेब्रुवारी २०१९ रोजी ब्रेन कॅन्सरचे ऑपरेशन अमेरिकेतील लॉस अँजेलिसमधील हॉस्पिटलमध्ये झाले होते. ऑपरेशन झाल्यानंतरही लॉस अँजेलिसमधील हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत होता.

मात्र त्याची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज आज संपली साईप्रसादने हिंदी रिअॅलिटी शो तसेच अमेरिकेतील लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. एम टीव्ही वाहिनीवरील 'स्प्लिट्स व्हिला' या शोच्या चौथ्या सीझनमध्ये तो होता. त्याचबरोबरीने एस.डब्ल्यु.ए.टी, द मार्स कॉन्स्परॅसिस,द कार्ड यांसारख्या अमेरिकन मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये तो झळकला. 

साईप्रसाद इथवरच थांबल नाही. त्याने हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे. फॅशन डिझायनर सपना अमीन हिच्यासोबत २०१५मध्ये साईने लग्न केले. अतिशय कमी वयात साईप्रसादचे निधन झाल्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

अभिनेते ऋषी कपूर, अभिनेता इरफान खान यांचे देखील कॅन्सर या आजाराने निधन झाले. बॉलिवूडच्या या दोन्ही कलाकारांनी देखील परदेशात जाऊन उपचार घेतले. बॉलिवूडच्या या दोन्ही कलाकारांचं एकापाठोपाठ एक अचानक निघून जाणं मनाला चटका लावून जाणारं होतं. आता साईप्रसादला देखील कॅन्सरमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

bollywood actor sai gundewar dies brain cancer

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT