Prajakta Mali  Esakal
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजूची हवा! सोनू सुदलाही प्राजक्ताच्या कौतुकाचा मोह आवरेना..

प्राजक्ता तिच्या खास फॅशनसाठी ओळखली जाते. प्राजक्ताने या खास सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला होता.

Vaishali Patil

मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. तिची 'रानबाजार' वेब सिरिज असो 'वाय' सिनेमा किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते. काही दिवसांपूर्वी तिनं प्राजक्तराज या तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डची घोषणा केली.

प्राजक्ता माळीनं स्वतःचा ज्वेलरी ब्रॅन्ड लॉन्च केलं तेव्हा त्याचं उद्धाटनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार मोठ्या दणक्यात पार पडलं. प्राजक्ताच्या या ब्रॅन्डचं नाव 'प्राजक्तराज' असे आहे.

अलीकडेच प्राजक्तानं ब्रह्मपुरी महोत्सावाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थीती लावली. या महोत्सवातील काही खास फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले. जे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत. विषेश म्हणजे तिच्या या फोटोत तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही आहे.

प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये फोटो शेअर करत लिहिलयं, “ब्रम्हपुरी महोत्सव…“प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं की मी भारावून गेले. खूप आभार. ठरवून टाकलं…‘प्राजक्तराज’चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार… “भद्रावती” "

Also Read - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

पुढे ती लिहिते, " By the way…सोनू सूद ही म्हणाले, “गळ्यातलं unique आहे..” अर्थातच @prajaktarajsaaj ची ‘वज्रटिक’ परिधान केली होती..”.

प्राजक्ता तिच्या खास फॅशनसाठी ओळखली जाते. प्राजक्ताने या खास सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला होता. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आणि त्यावर ज्वेलरीही घालून तिचा लूक पुर्ण केला होता. प्राजक्तानं गळ्यात घातलेल्या दागिन्याचं सोनू सूदने कौतुक केल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT