Sushant Singh Rajput Death case
Sushant Singh Rajput Death case  esakal
मनोरंजन

SSR Death Anniversary: हत्या की आत्महत्या प्रश्न अनुत्तरीतच?

युगंधर ताजणे

Bollywood Actor Sushant Singh Rajput: प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंगची आत्महत्या बॉलीवूडला चटका लावून गेली. त्याचं जाणं हे त्याच्या लाखो (Entertainment News) चाहत्यांना परवडणारे नव्हते. अल्पावधीतच सुशांतनं चाहत्यांना आपलेसं केलं होतं. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद मोठा होता. धोनीवरील बायोपिकनं त्याला स्टार केलं. पीकेमध्येही त्याच्या (Bollywood Movies) छोट्याशा भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले होते. यानंतर केदारनाथमध्ये त्याचा वेगळा लूक प्रेक्षकांना खूप भावला. तर छिचोरेत त्यानं साकारलेल प्रेरणादायी पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं. सुशांत ज्या वेगानं बॉलीवूडमध्ये आला त्याच वेगानं तो निघुन गेला. पण त्याच्या जाण्यानं चाहत्यांच्या (bollywood actors) मनात निर्माण झालेली पोकळी अजुनही भरुन आलेली नाही.

14 जुन 2020 रोजी सुशांत सिंग राजपुतचा त्याच्या घरी मृत्यु झाला होता. प्रथम दर्शनी त्यानं राहत्या घरात आत्महत्या केल्याचे दिसून आले होते. त्यावेळी एम्सच्या माहितीनुसार त्यानं आत्महत्या केली. असा रिपोर्ट समोर आला होता. त्यानंतर सुशांत सिंगच्या कुटूंबियांकडून त्याच्या या आत्महत्येची चौकशी करण्यात यावी. तातडीनं या घटनेचा तपास करुन त्याच्यातील सत्यता समोर यावी अशी मागणी करण्यात आली होती. सुशांतचे जे चाहते आहेत त्यांनी देखील वेळोवेळी सोशल मीडियावरुन सुशांतच्या आत्महत्या घटनेचा तपास करावा अशी मागणी केली होती. सुशांतच्या फॅन्सनं तर पोलिसांवर देखील तपासासाठी दबाव आणल्याचे दिसून आले होते.

गेल्या दोन वर्षांपासून पोलीस, सीबीआय, याशिवाय ईडी आणि एनसीबीकडून अद्याप या घटनेचा तपास सुरु आहे. त्या तपासातून अधिकृतरीत्या संबंधित घटनाबाबत कायदेशीर बाब समोर आलेली नाही. हत्या आहे की आत्महत्या असा वाद सुरुच आहे. पोलिसांनी देखील अनेकदा त्या घटनेला आत्महत्या असे म्हटले होते. सुशांतच्या चाहत्यांनी नेहमीच सुशांतची बाजू घेत तो आत्महत्या करण्याची शक्यता कमी आहे अशी असे त्यांनी म्हटले होते.

दोन वर्षांपासून जो तपास सुरु आहे त्यातील महत्वाच्या घटना कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 14 जुन 2020 रोजी पोलिसांनी सुशांतच्या त्या घटनेला आत्महत्या असे म्हटले. त्यांनी जे दावे केले त्याबाबत ठोस पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत. बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रनौत हिनं तर त्यावेळी सुशांत सिंग वरुन बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांवर टीका केली होती. बॉलीवूडमधील नेपोटिझमचं प्रकरण जोरदारपणे समोर आले होते. याशिवाय बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणही गाजले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT