मुंबई - कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. राज्य शासनानं कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीनं उपाययोजना राबण्यास सुरुवातही केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही केले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होण्याचे नाव घेत नाही. बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होताना दिसत आहे. यापूर्वी अनेक मोठमोठ्या कलावंतांना कोरोनानं ग्रासलं आहे. काही कलाकारांनी स्वतला क्वॉरंनटाईनही करुन घेतलं आहे. आता आणखी अभिनेत्याला कोरोना झाला आहे. त्याचे नाव विक्रम मेस्सी असे आहे. त्यानं सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.
विक्रांतनं सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यानं लिहिलं आहे की, चित्रिकरणाच्या वेळी मी योग्य ती काळजी घेऊनही मला कोरोना झाला. आता मी क्वॉरंनटाईन आहे. सर्वांना माझे सांगणे आहे की, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य प्रशासनानं सांगितलेल्या सुचनांचे पालन करुन कोरोनाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना असे सांगणे आहे की, त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांनी तातडीनं आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी. ते सगळ्यात महत्वाचे आहे. मी आता औषधोपचार घेण्यास सुरुवात केली आहे. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा. असे आवाहनही त्यानं केलं आहे.
विक्रांत मेस्सी त्याच्या आगामी हसीन दिलरुबा नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री तापसी पन्नुही दिसणार आहे. याशिवाय त्यानं दाक्षिणात्य सुपस्टार विजय सेतुपती याच्यासोबत मुंबईकर नावाच्या चित्रपटाची शुटिंग पूर्ण केली आहे. विक्रांत गेल्या वर्षी शीतल ठाकूर सोबत लग्न करणार होता. मात्र कोरोनामुळे त्याला त्याचे लग्नही पुढे ढकवावे लागले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो पुढील काही महिन्यांमध्ये विवाहबध्द होणार आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना कोरोनाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या दररोज वेगवेगळे कलाकार कोरोना पॉझिटि्व्ह येत असल्याची माहिती समोर येते आहे. यापूर्वी बॉलीवूडमधल्या आमीर खान, आर माधवन, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन, सिध्दांत चतुर्वेदी, तारा सुतारिया आणि सतीश कौशिक, मिलिंद सोमण यांच्यासहित अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.