bollywood actors sonu sood manish malhotra arjun rampal neil nitin mukesh  Team esakal
मनोरंजन

एका दिवसांत चार सेलिब्रेटींना झाला कोरोना

कोरोनानं बॉलीवूडला घेरल्यामुळे अनेक चित्रपटांचे शुटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं सर्वांचीच दमछाक झाली आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सातत्यानं वाढणारा प्रभाव. देशात सर्वाधिक कोरोनाचे पेशंट महाराष्ट्रात सापडत आहेत. जगातही सर्वाधिक पेशंट भारतात सापडत आहेत. त्यामुळे या भयंकर आजाराचा कसा सामना करावा असा प्रश्न प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांना पडला आहे. राज्य शासनानं सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र अद्याप त्यांना म्हणावे असे यश आलेलं नाही. कोरोना रुग्ण संख्या वेगानं वाढत असल्यानं सर्वांमध्ये भीतीचे सावट आहे. या आजाराला कशाप्रकारे सामोरं जावं त्यासाठी सतत वैद्यकीय अधिकारी नागरिकांना आवाहन आणि महत्वाच्या सुचनाही देत आहेत. गेल्या महिनाभरापासून बॉलीवूडलाही कोरोनानं घेरलं आहे.

गेल्या 24 तासांत बॉलीवूडमधील चार सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता बॉलीवूडमधील कलाकारांमध्ये भीती पसरली आहे. यापूर्वी कोरोनानं बॉलीवूडला घेरल्यामुळे अनेक चित्रपटांचे शुटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. त्याला सामोरं जाताना सर्वसामान्य नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यत अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाची लागण होऊ नये यासाठी चाहत्यांना सावधान केले आहे.

अर्जुन रामपालला कोरोना झाला आहे. त्यानं त्याविषयी सोशल मीडियावल सांगितलं आहे. माझा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र मला अद्याप कोणतेही लक्षणं दिसून आलेली नाहीत. रिपोर्ट आल्यानंतर मी घरात क्वॉरंनटाईन झालो आहे. तसेच आरोग्य विभागानं ज्या सुचना दिल्या आहेत त्याचे पालन मी केले आहे. योग्य ती सर्व औषधेही मी घेतली आहेत. दहा दिवसांत माझा ज्या लोकांशी संपर्क आला त्यांनीही आपली कोरोनाची चाचणी करुन घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सध्याचा काळ मोठा बाका आहे. अशावेळी सर्वांनी आपआपली काळजी घ्यावी. घरातच राहावे. आपल्या सर्वांना जागरुक राहावे लागणार आहे. तेव्हाच आपण या आजाराला हरवू. असेही त्यानं म्हटलं आहे.

नील नितिन मुकेशलाही कोरोनानं घेरलं आहे. त्यानं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, सगळी काळजी घेऊनही मला कोरोना झाला आहे. याबाबत मला काहीही माहिती नाही. माझ्या घरातल्या अनेक सदस्यांनाही कोरोना झाला आहे. आम्ही सर्वजण होम क्वॉरंनटाईन झालो आहोत. आता गरज आहे ती सर्व सुचनांचे पालन करण्याची. सर्वांना मदत करण्यात आघाडीवर असणारा अभिनेता सोनु सुदलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याविषयी सांगितले आहे की, कोरोना झाला म्हणून काय़ झालं, त्याला परतावून मी तुम्हा सर्वांना पुन्हा लवकर भेटेन.

बॉलीवूडचा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यानं सांगितलं आहे की, मला जेव्हा कोरोना झाला आहे असे कळले तेव्हा मी होम क्वॉरनटाईन झालो. मी सर्व नियमांचे पालन करत आहे. सर्व प्रकारची काळजीही मी घेतली आहे. तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT