Bollywood Actress Alia Bhatt comment  esakal
मनोरंजन

Tollywood Vs Bollywood: 'भाषेचं काय घेऊन बसता, सगळचं...' आलिया बिनधास्त बोलली

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया ही आता (Bolllywood Actress) ब्रम्हास्त्र चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Vs Tollywood: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया ही आता (Bolllywood Actress) ब्रम्हास्त्र चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. काल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र गेल्या काही (Bramhastra movie) वर्षांपासून चर्चा सुरु असणाऱ्या अनेक प्रेक्षकांची निराशा केल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात आलियानं बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा (Tollywood movie) जो वाद सुरु आहे त्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडपटांवर मात करत कमाईचे विक्रम केले आहेत. यासगळ्यात टॉलीवूड आणि बॉलीवूड असा वाद सुरु झाला होता.

कित्येक सेलिब्रेटींनी आतापर्यत या वादावर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वास्तविक हा सारा प्रकार अल्लु अर्जुनच्या पुष्पापासून सुरु झाला. त्यानंतर आरआरआर, केजीएफ 2 आणि कमल हासन यांचा विक्रम या साऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलीवूडच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. त्यामुळे बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना मोठ्या अपयशाला सामोर जावं लागलं आहे. आता आलियानं तिला बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड याविषयी काय वाटते हे तिनं सांगितलं आहे.

आलियानं म्हटलं आहे की, चित्रपट हा तमिळ असो, कन्नड असो किंवा हिंदी हे जास्त महत्वाचं नाही तर तो भारतीय आहे हे आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे. आपण चित्रपटांच्या कथेकडं जास्त लक्ष देत नाही. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आणि त्याचे सादरीकरण आवडले तर प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद करण्यात काही अर्थ नाही. असा वाद निर्माण करुन आपण चित्रपटांचा आनंद घेत नाही. त्यांच्यापासून दूर जात आहोत. अशी खंत आलियानं व्यक्त केली आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. त्यावरुन रणबीरला ट्रोलही करण्यात आले आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलक काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला नाही. बरेच मान्यवर कलाकार या चित्रपटात आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून टॉलीवूडच्या नागार्जुनपर्यत अनेक मोठमोठ्या कलाकारांचा या चित्रपटामध्ये समावेश आहे. असे असताना प्रेक्षकांना ब्रम्हास्त्रचा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास कमी पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed : बँक व्यवहार सलग ३ दिवस बंद राहणार? बँक कर्मचारी संपावर; कधी, कुठे आणि कोणाला बसणार फटका?

निगरगट्ट कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय, अभिनेता शशांक केतकरने पोस्ट करत व्यक्त केला संताप, म्हणाला... 'आता त्याने..'

Latest Marathi News Live Update :दिल्ली दंगल प्रकरणी उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाहीच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Sharma Viral Video : रोहित नेमका कोणत्या कारणाने छोट्या फॅनवर चिडला? वेगळंच चित्र रंगवलं जातंय, पण सत्य समजताच हिटमॅनबद्दल वाढेल आदर

Sangli : काँक्रिटच्या जंगलात हरवत चाललेले पक्षी; सांगलीत पक्षी निरीक्षणाची चळवळ शाळांपर्यंत नेण्याची गरज

SCROLL FOR NEXT