ayesha takia file image
मनोरंजन

आयशा टाकिया सर्जरीमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'कोण होतीस तू, काय झालीस तू'

लिप सर्जरीनंतर बददला आयशाचा चेहरामोहरा

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आयशा टाकियाने (ayesha takia) चित्रपटांमधून ब्रेक घेतला असून ती सोशल मीडियावरून प्रेक्षकांच्या नेहमी भेटीस येत असते. नुकताच आयशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. आयशाच्या या व्हिडीओमध्ये तिच्या ओठांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. अनेकांनी तिच्या या व्हिडीओला कमेंट करून तिला ट्रोल केले आहे. (bollywood actress ayesha takia trolled for lip surgery)

ओठांच्या सर्जरीमुळे आयशा पुन्हा झाली ट्रोल

आयशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने तिच्या या व्हिडीओला कमेंट करत लिहीले, 'काय झालंय तुला? कोण होती तू आणि आता काय झाली तू?', तर दुसऱ्याने लिहीले, 'सर्जरीमुळे तुमचा पुर्ण चेहरा खराब झाला आहे.' 2017 साली एका कॅफेच्या लॉन्चसाठी आयशाने उपस्थिती लावली होती. त्यावेळी लिप सर्जरीनंतर ती पाहिल्यांदाच लोकांसमोर आली होती. त्यावेळी देखील आयशाला अनेकांनी ट्रोल केले होते.

एका मुलाखतीमध्ये ट्रोलिंगबद्दल आयशाने आपले मत मांडले होते. तेव्हा ती म्हणाली होती, 'कोणालाही कमी लेखू नये. आपण सर्व जण वेगळे आहोत आणि यामध्येच आपलं सौंदर्य आहे.' आयशाने 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'टारझन द वंडर कार' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने सलमान खानसोबत 'वॉन्टेड' या सुपर हिट चित्रपटामध्ये काम केले. होम डिलिव्हरी, शादी नंबर 1, सलाम ऐ इश्क या चित्रपटांमध्ये आयशाने काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ‘शिवी दिली म्हणजे गुन्हा नाही!’ ; SC/ST कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा खुलासा, महत्त्वाचा निकाल वाचा

अग्रलेख - अमेरिकी ‘बेट’कुळ्या

इन्फ्लुएन्सर तरुणीने आरोप करत VIDEO VIRAL केला, तरुणानं स्वत:ला संपवलं

Latest Marathi News Live Update : महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी जाहीर होणार

Satara politics: राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्‍का; बावधनच्या पिसाळ कुटुंबीयांचा भाजपमध्ये प्रवेश, मदन भोसले गटाची वाढली ताकद!

SCROLL FOR NEXT