Bollywood Actress Deepti Naval  esakal
मनोरंजन

Literature Festival Shimla: जालियनवाला बागेत सेल्फी काढता? दीप्ती नवल भडकल्या

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल या सध्या शिमल्यातील साहित्य महोत्सवामध्ये सहभागी झाल्या आहे. त्याठिकाणी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Actress: बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल या सध्या शिमल्यातील साहित्य महोत्सवामध्ये सहभागी झाल्या आहे. त्याठिकाणी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. दीप्ती नवल या 80 च्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. (Bollywood news) त्या साहित्यिका आणि चित्रकार देखील आहेत. आपल्या ठाम भूमिकेबद्दल आणि परखड वक्तव्याबद्दल त्या ओळखल्या जातात. त्यांनी जालियनवाला बागेसंबंधी केलेलं वक्तव्य तरुण पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. Literature Festival Shimla Deepti Naval news

हल्ली कोणत्याही ठिकाणी गेलं की सेल्फी घेणं हा तरुणाईचा आगळा वेगळा फंडा (Entertainment news) झाला आहे. कुठे गेलो आणि त्याठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेतला नाही तर त्याचे वाईट तरुणांना वाटते. मात्र यासगळ्यात आपण कोणत्या ठिकाणी सेल्फी घेत आहोत, त्याठिकाणाचे महत्व काय, इतिहास काय आहे याचा त्यांना विसर पडलेला असतो. त्याकडे दीप्ती नवल यांनी लक्ष वेधले असून जालियनवाला बागेत सेल्फी घेणाऱ्यांवर कडाडून टीकाही केली आहे. त्या काय म्हणाल्या हे आपण जाणून घेणार आहोत. शिमल्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य उत्सवामध्ये दीप्ती नवल सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी त्या महोत्सवातील शब्द आणि समज कार्यक्रमातून आपले विचार व्यक्त केले.

बालपण अमृतसरमध्ये घालवलेल्या दीप्ती नवल यांचा बराचसा जीवन प्रवास अमेरिकेत झाला आहे. मात्र भारत आणि येथील संस्कृतीविषयी त्यांना असलेलं प्रेम हे नेहमीच त्यांच्या चित्रांतून आणि साहित्यातून दिसून आले आहे. जालियनवाला बागेसंबंधी त्या म्हणाल्या, जालियनवाला आता सेल्फी पॉइंट झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी जाताना विचार करावा लागतो. ते ठिकाण काय आहे त्याचा इतिहास काय आहे याचा आपल्याला विसर पडलेला आहे. त्याठिकाणाला पिंक ठिकाण बनवण्यात आले आहे. यासगळ्याची काय गरज आहे. तुम्ही हिरोशिमाला जा, अजुनही त्याठिकाणी त्या महायुध्दातल्या खुणा जाणीवपूर्वक तुमच्या निदर्शनास आणून दिल्या जातात.

आपण आपण संवेदनाहीन होत चाललो आहोत. कसलाही विचार फार भौतिकपातळीवर करतो आहोत. त्यामुळे अनेकदा आपण चुकतो आहोत हेही आपल्या लक्षात येत नाही. कुणी ते लक्षात आणून दिल्यानंतर देखील आपण पुन्हा त्याच पद्धतीनं वागतो याची खंत वाटत असल्याचे दीप्ती नवल यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT