मनोरंजन

अभिनेत्री दिव्या भारतीच्या वडिलांचे निधन

बॉलीवूडमध्ये कोणेएकेकाळी लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री दिव्या भारतीनं लवकरच आपल्या जीवनयात्रेला पूर्णविराम दिला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये कोणेएकेकाळी लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री दिव्या भारतीनं लवकरच आपल्या जीवनयात्रेला पूर्णविराम दिला. आता हाती आलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ओम प्रकाश भारती असे त्यांचे नाव होते. बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. दिव्या भारतीचे पती साजिद नाडियावाला यांनी शेवटपर्यत त्यांचा सांभाळ केला. सोशल मीडियावरुन ओम भारती यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.

दिव्या भारतीबाबत सांगायचे झाल्यास तिनं 1993 मध्ये एका बिल्डिंगवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या त्या आत्महत्येनंतर बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता. याचे कारण त्यावेळी दिव्या भारती बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री होती. तिनं नैराश्यातून ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती भारती यांच्या निकटवर्तींयांनी दिली आहे. बॉलीवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, साजिद नाडियावाला यांना दिव्या भारतीच्या वडिलांप्रती जिव्हाळा होता. दिव्या भारतीच्या जाण्यानंतर त्यांनी त्यांचा सांभाळ केला होता. त्यांना मानसिक आधार दिला. साजिद ना़डियावाला यांनी दिव्या भारतीशी लग्न केले होते.

दिव्याचे निधन झाल्यानंतर ओम भारती एकटे पडले. त्यावेळी त्यांना आधार देण्यासाठी साजिद यांनी पुढाकार घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यानं 1992 मध्ये सनी देओलसोबत विश्वात्मा मधून हिंदी चित्रपटामध्ये डेब्यु केला. तिचा शेवटचा चित्रपट शतरंज हा होता. 10 मे 1992 मध्ये साजिद नाडियावाला आणि दिव्याचं लग्न झालं होतं. दिव्यानं लग्नानंतर मुस्लिम धर्म स्विकारुन आपलं नाव सना असं केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

Ambegaon Super 23 Initiative: आंबेगाव सुपर 23 उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गौरवोद्गार

Asthma Day Warning: जागतिक दमा दिनानिमित्त तज्ज्ञांचा इशारा: वसई-विरार, मीरा रोड व मुंबईत वाढते श्वसन आजार

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

SCROLL FOR NEXT