Evelyn Sharma Esakal
मनोरंजन

Evelyn Sharma: कुणी तरी येणार गं! 'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

Vaishali Patil

अयान मुखर्जीचा सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दिवानी' आणि 'यारियां'मध्‍ये महत्वाच्या भूमिका साकारणारी एल्विन शर्मा हिने नुकतीच तिच्‍या गरोदरपणाची घोषणा केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्माने लग्नानंतर इंडस्ट्रीतुन काढता पाय घेतला. ती शेवटची 'साहो' आणि 'एक्स-रे' या चित्रपटात दिसली होती.

ती एका मुलीची आई असून आता दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. एव्हलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

एल्विनने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. एव्हलिन शर्मा काळ्या स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्समध्ये तिचा फोटो शेअर केला. या फोटोत ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.या फोटोसह, अभिनेत्रीने लिहिले आहे- 'मी आता तुला माझ्या हातात धरण्यासाठी उत्सुक आहे!! बेबी #2 ऑन द वे!'

२०१९ मध्ये एल्विन शर्मा शेवटचा चित्रपट करत केला आणि ती मोठ्या पडद्यावरुन गायब झाली. मात्र ती सोशल मीडियावर पूर्णपणे सक्रिय आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे आणि तिच्या पतीचे आणि मुलीचे फोटो शेअर करून चर्चेत असते. एव्हलिनने मे २०२१ मध्ये इंडो-ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन आणि उद्योगपती तुषान भिंडीशी लग्न केले होते. लग्नानंतरच ती एका मुलीची आई झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT