Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez Instagram
मनोरंजन

जॅकलीनला सुकेशबरोबरची 'दोस्ती' पडली महागात, चित्रपटातून बाहेर?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन (Bollywood Actress Jacquelin Fernandiz) ही ईडीच्या (ED Notice) कारवायांमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावरही (Social Media) नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. आता यासगळ्याचा मोठा परिणाम तिच्या आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवरही झाला आहे. तिला तिच्या एका चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनी माफिया सुकेश चंद्रशेखरसोबतचे (Sukesh Chandrashekhar) तिचे काही बोल्ड फोटो (Bold Photo Viral Social Media) सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोले केले होते. तिच्यावर टीकाही केली होती. सुकेशनं केवळ तिलाच नाहीतर तिच्या कुटूंबियांना देखील पैशांची मदत केल्याची माहिती ईडीनं केली होती.

सुकेश चंद्रशेखर (Sueksh Chandrashekhar) हा 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. जॅकलीनबरोबरच नोरा फतेहीची (Nora fatehi) देखील चौकशी सुरु असल्याचे दिसून आले आहे. सुकेश हा काही बॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या संपर्कात होता. त्यामुळे आणखी त्या अभिनेत्रींची नावं समोर येणार आहेत. ईडीनं अजून ती नावं जाहीर केलेली नाहीत. आता जॅकलीनसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सुकेश चंद्रशेखर या घटनेचा परिणाम तिच्या करिअरवर झाल्याचे दिसून येत आहे. तिला एका चित्रपटातून माघार घ्यावी लागली आहे. तो चित्रपट बिग बजेट चित्रपट आहे. सध्या जॅकलीनची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

मीडिया रिपोर्टस नुसार, जॅकलीन फर्नांडिझ ही आता नागार्जुन अक्कीनेनीच्या द घोस्टचा भाग नाही. तिला त्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र त्याची कारणं वेगवेगळ्या प्रकारे समोर आली आहेत. काहीजण म्हणत आहे की तिला सुकेश चंद्रशेखर हे प्रकरण महागात पडलं आहे. त्याचा परिणम तिच्या करियरवर झाला आहे. मात्र अजुन द घोस्टच्या निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही. असेही सांगितलं जात आहे की, जॅकलीनला देण्यात येणाऱ्या मानधनाचा आकडा हा मोठा असल्यानं तिचा रिप्लेस करण्याचा विचार सुरु झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT