rrr movie
rrr movie  esakal
मनोरंजन

Video: RRR चे कौतुक करताना कंगना थकेना!काय म्हणाली पाहा...

युगंधर ताजणे

bollywood movies: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (bollywood actress) ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सध्या कंगनाच्या (kangana ranaut) लॉक अपच्या लोकप्रियतेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनाला कोणताही विषय वर्ज्य नाही. ती (tv entertainment news) राजकारणापासून धार्मिक विषयापासून कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देते. त्यामुळे कित्येकदा तिच्या प्रतिक्रियेवरुन वाद होताना दिसून आले आहे. शेतकरी आंदोलन, जावेद अख्तर प्रकरण, देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ते बॉलीवूडमधील माफिया यासारख्या गोष्टींवर कंगनानं केलेलं वक्तव्य नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय होते. आता कंगनान एस एस राजामौली यांच्या (rrr movie) आरआरआर या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटाचे कौतुक करताना कंगना थकत नाही.

राजामौली यांचा आरआरआर हा गेल्या तीन वर्षांपासून प्रदर्शित होण्याच्या प्रतिक्षेत होता. मात्र कोरोनाचा फटका या चित्रपटाला बसला. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून आरआरआरच्या प्रदर्शनाचे वेध चाहत्यांना लागले होते. मात्र काही काळासाठी पुन्हा लॉ़कडाऊनचे सावट असल्यानं त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. अखेर तो गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला असून त्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवल्याचे दिसून आले आहे. कंगनानं सोशल मीडियावर आरआरआरचं कौतुक करतानाचा व्हिडिओ शेयर झाला आहे. त्यामध्ये तिनं राजामौली आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतूकही केलं आहे.

कंगनानं इंस्टावरुन आरआरआरचं कौतुक केलं आहे. कालच मी माझ्या कुटूंबियासमवेत आरआऱआर पाहिला. मला तो आवडला. या चित्रपटाला प्रचाराची काही गरज नाही. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक ठरणार असल्याचे दिसते. देशभक्तीच्या विषयानं प्रेरित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतो आहे. ही सगळ्यात आनंदाची बाब म्हणावी लागेल. कंगनाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती थिएटरच्या बाहेर येऊन या चित्रपटाच्याबाबत काही बोलत आहे. यावेळी उपस्थित असलेल्या काही रिपोर्टसनं तिला प्रश्न विचारले. त्यावर कंगनानं प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT