actress kangana ranaut  Team esakal
मनोरंजन

Lock Upp: 'आता तू रडणार'! कंगनाचा करण जोहरला इशारा: सांगितलं कारण

कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येणारी अभिनेत्री आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Actress: कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येणारी अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून (Kangana Ranaut) तिनं वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं करुन (bollywood movies) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजप पक्षाशी जवळीक असणारी कंगना देशाच्या राजकारणावरही परखडपणे भाष्य करणारी सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाते. सध्या तिनं तिचा लॉक अप नावाचा रियॅलिटी शो सुरु केला आहे. त्यामध्ये तिनं देशातील सर्वाधिक वादग्रस्त (tv entertainment news) असे सेलिब्रेटी घेतले आहे. या शो मधून हे सेलिब्रेटी त्यांच्या आयुष्याशी संबंधित धक्कादायक खुलासे करत असतात. कंगनानं देखील असाच एक खुलासा केला आहे. मात्र त्यातून तिनं बॉलीवूडच्या प्रथितयश अशा निर्माता आणि दिग्दर्शकाला गंभीर इशाराही दिला आहे. काय म्हणाली कंगना हे आपण जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियावर कंगनाच्या लॉक अपची जोरदार चर्चा आहे. आता या शोनं 200 मिलियन दर्शकांची संख्या ओलांडली आहे. त्यावरुन कंगनाच्या या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात येईल. कंगनानं बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला खणखणीत इशारा दिला आहे. त्यामध्ये ती म्हणते, पुढील दिवसांत करण तुला रडण्याची वेळ येणार आहे. पापा जो तुझ्या रडण्याचे दिवस आता लवकरच येणार आहेत. अशा शब्दांत कंगणानं करणला डिवचले आहे. यापूर्वी देखील कंगनानं करणवर टीका केली आहे. बॉलीवूडमधील माफिया असा उल्लेख तिनं त्याचा केला होता. करण आणि कंगनाचं वॉर हे काही बॉलीवूडला नवीन नाही. मात्र कंगनानं थेट करणला रडवण्याची भाषा केल्यानं दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना या गोष्टींची उत्सुकता आहे.

Kangana Lock Upp show

कंगनानं तिच्या लॉक अप शो च्या दरम्यान काही बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना लक्ष्य केलं आहे. त्यामध्ये करण जोहरचा उल्लेख आहे. तिनं सलमान खान, शाहरुख खान यांच्यावरही सडकून टीका केली आहे. सलमानवर टीका केल्यानं तिला राखी सावंतशी पंगा घेतला होता. राखीनं तर कंगनाला तिचा शो शंभर दिवस पूर्ण करुन दाखवावा. असं आव्हान दिलं होतं. कंगनाच्या लॉक अपनं आतापर्यत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. माझा शो नीट चालणार नाही. तो बंद पडेल असे म्हणणाऱ्यांना मी थेट उत्तर देते आहे. त्यामुळे जे कुणी पापा जो आहेत त्यांच्या रडण्याचे दिवस आल्याचे कंगनानं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT