Priyanka Chopra Esakal
मनोरंजन

Priyanka Chopra: अखेर प्रियंकाने दाखवला मुलीचा चेहरा! चाहते म्हणाले, “तिचे ओठ...”

सकाळ डिजिटल टीम

(Priyanka Chopra finally reveals daughter Malti Marie face)अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आपल्य लाडक्या मुलीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी ती सोडत  नाही. ती अनेकदा तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत फोटो शेअर करत असते. मात्र या फोटोत ती तिचा चेहरा स्पष्ट दिसू देत नाही. त्यामूळे काही वेळा तिचे फॅन्स तिच्यावर नाराजही होतात. पण आज काही वेगळ चित्र पाहायला मिळतयं. प्रिंयकावर आणि तिच्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Priyanka Chopra daughter

त्याचे कारणही तितकेच खास आहे. प्रियंकाने तिच्या चाहत्याची सकाळ गोड करण्यासाठी मालतीचा नवीन फोटो  पोस्ट केलायं. बुधवारी पहाटे प्रियांकान इंस्टाग्राम स्टोरीवर मालती मेरीचा झोपलेला फोटो शेअर केलाय. याफोटोत, मालती मेरी चोप्रा जोनास बेबी स्ट्रॉलरच्या आत एका बाजूला झोपली आहे. बाळाने पांढऱ्या रंगाचं स्वेटर आणि गुलाबी टोपी घातलेली आहे. आणि तिच्याभोवती शाल गुंडाळलेली फोटोत दिसतेय. प्रियंका सहसा तिच्या मुलीच्या चेहरा हृदयाच्या इमोजीने तिचा चेहरा लपवायची मात्र तिने बुधवारी मालतीचा अर्धा चेहरा उघड केला. तिचे डोळे उबदार टोपीने झाकलेले होते तरी तिचे ओठ या फोटोत दिसताय.

ती झोपली असताना तिचा एक हात ब्लँकेटमधून दिसतोय. फोटो शेअर करताना प्रियांकाने पोस्टला कॅप्शन दिले, " मला म्हणायचंय" मालती इस्टांग्रामवर एका चाहत्याने हा फोटो शेअर केला आहे. अनेक लोकांनी कमेंट करत या चिमुकलीवर प्रेमाचा वर्षाव केला. एक चाहत्याने कमेंट केलीय, "ओह शेवटी...इतकी सुंदर बाळ." दुसर्‍याने म्हटंलय, "सुंदर राजकुमारी." "ती खूप सुंदर आहे," तर एका युर्जसने लिहिले. "तुम्ही तिच्याकडे बारकाईने पाहिले तर तिचे ओठ निकसारखे दिसताय"

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

प्रियांकाने डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरच्या पॅलेसमध्ये निक जोनाससोबत लग्न केले. जानेवारी 2022 मध्ये, जोडप्याने सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीचे स्वागत केल्याचं चाहत्यांसोबत जाहिर केलं.

‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि ‘सिटाडेल’ या सिरीजमध्ये प्रियंका दिसणार आहे. तसंच प्रियांका ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. जो फरहान अख्तर दिग्दर्शित असेल. यात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT