Rakhi Sawant Viral Video Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Video Viral: 'आई आजारी तरी मी 'पठाण'वर रिल बनवणार', राखीची अजब इच्छा

पापाराझींनी शाहरुखच्या 'पठाण' बद्दल विचारलं असता राखीची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

Vaishali Patil

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिचं लग्न, तिच्या आईची प्रकृती, तिचा आणि शर्लिनचा वाद..अशातही राखी काही शांत बसतांना दिसत नाहीये. ती आईला भेटण्यासाठी जातांनांही तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतं आहेत. ज्यामध्ये ती तिच्या आईच्या प्रकृतीबदद्ल आणि बऱ्याच गोष्टीबाबत बोलत असते.

नुकतच तिला पापाराझींनी शाहरुखच्या 'पठाण' बद्दल विचारलं असता तिची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिव्डिओमध्ये राखी म्हणते, “पठाणसाठी खूप खूप शुभेच्छा शाहरुखजी मला माफ करा. 'पठाण' च्या झुमे जो पठाणगाण्यावर मी त्यावर डान्स नाही करु शकले, कारण माझी आई रुग्णालयात आहे. पण मी प्रयत्न करेन रील बनवणवून टाकण्याचा उद्या काहीही करुन शाहरुखसाठी एक रिल पोस्ट करेल.पठाण हिट आहे, आई शाहरुखच्या पठाणला तुझा आशीर्वाद दे"

राखीच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ येत्या बुधवारी २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच धूमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग तुफान वेगाने सुरू आहे. पठाण चित्रपटातून 4 वर्षांनंतर शाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. 

दरम्यान राखी सावंतला मॉडेलचा शर्लिन चोप्राचे फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी अटक केली होती. तिने अटक होण्यापासून सुटका व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अपील केलं आहे. राखीला तुर्तास हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून मंगळवारपर्यंत राखीला कोणतीही अटक होणार नाही, असा आदेश हायकोर्टाने दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : संजय राऊत यांनी CJI सूर्यकांत यांची बिनशर्त मागितली माफी; म्हणाले- कोर्टाचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता

Mehmaan Mode: आता 'मेहमान मोड' ऑन करा आणि पाहुण्यांसोबत बिनधास्त जेवण ऑर्डर करा! काय आहे झोमॅटोचे नवे फिचर?

दुष्काळात जगायचं कसं? कर्जासाठी शेतकऱ्याचं घरच केलं सील, कुटुंब उघड्यावर! सीलला हात लावला तर कारवाईचा इशारा... सरकारचे आदेश कागदावरच?

Latest Marathi News Update : पालकमंत्री हसन मुश्रीफांकडून नंदुरबारमध्ये थेट बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

Koyna Dam Water Release : सांगलीसाठी कोयनेचे दरवाजे उघडले! 2100 क्युसेकने विसर्ग सुरू; शेतीसाठी पाण्याचा उपसा केल्यास थेट 1 वर्षासाठी परवाना रद्द

SCROLL FOR NEXT