Vidya Balan Esakal
मनोरंजन

सहा महिने आरशात पाहिलंच नाही, का म्हणाली विद्या बालन असं?

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Bollywood Actress Vidya Balan) ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jalsa Movie: प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Bollywood Actress Vidya Balan) ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. सध्या तिच्या (Bollywood News) आगामी जलसा नावाच्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. य़ामध्ये ती प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शहासोबत (Shefali Shah) दिसणार आहे. आपल्या हटके भूमिकांसाठी विद्या बालनला प्रेक्षकांची नेहमीच पसंती (Entertainment News) मिळाली आहे. वैशिष्ट्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून चाहते विद्याच्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत (Bollywood Movies) असतात. विद्यानं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्यासोबत जो प्रसंग घडला त्या कारणास्तव ती कमालीची अस्वस्थ झाल्याचे तिनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

आपल्या आयुष्यात तो प्रसंग घडला त्यामुळे पुढील सहा महिने आपल्याला आरशासमोर उभं राहण्याची लाज वाटत होती. अशा प्रकारची धक्कादायक प्रतिक्रिया विद्यानं दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत नेमकं असं काय घडलं? हे जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता आहे. सध्या ती जलसाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याप्रसंगी तिनं दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतीतून घडलेल्या त्या मुलाखतीविषयी सांगितलं आहे. विद्यानं सांगितलं, मला अनेक चित्रपटांमधून रिप्लेस करण्यात आलं होतं. निर्मात बोलावून घ्यायचे. ऑडिशन व्हायची. पण त्यांचा नकार ठरलेला असायचा. अशावेळी मी कमालीची निराश झाले होते. मला काय करावं कळेना. जवळपास 13 चित्रपटांमधून मला बाहेर काढलं होतं. एका निर्मात्यानं माझ्याशी गैरवर्तन केलं. आणि त्याच्या चित्रपटातून काढून टाकलं. तो ज्याप्रकारे माझ्यासोबत वागला त्यामुळे मला सहा महिने आरशात पाहण्याची भीती वाटत होती. अशी प्रतिक्रिया विद्यानं दिली आहे.

2003 -04 सालची ती गोष्ट आहे. त्यावेळी मला अनेक चित्रपटांमधून नकार मिळाला होता. तेव्हा मी के बालचंद्र यांचे दोन चित्रपट साईन केले होते. मात्र त्यातून मला रिप्लेस करण्यात आले. हे कळल्यावर मला कमालीचे वाईट वाटले. विद्या बालननं टीव्ही मनोरंजन मालिका हम पाँच पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. विद्या बालनचा चाहतावर्गही मोठा आहे. आता तिचा शेफाली शहा सोबत जलसा नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तो 18 मार्चला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये मानव कौल, रोहिणी आणि इक्बाल खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी विद्याचा शेरनी, शकुंतला देवी, नटखट नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT