Zaira Wasim 
मनोरंजन

Hijab Row: दंगल गर्ल जायराची हिजाबवरुन आगपाखड, हिजाब म्हणजे...

कर्नाटकमध्ये चाललेल्या हिजाबच्या वादानं साऱ्या (Hijab Row) देशाचे लक्ष वेधून घेतलं आहे.

युगंधर ताजणे

Entertainment News: कर्नाटकमध्ये चाललेल्या हिजाबच्या वादानं साऱ्या (Hijab Row) देशाचे लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या (Social Media News) प्रकरणावरुन बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी (Bollywood News) नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत, अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा (Bollywood Actress) यांनी हिजाबवरुन तेथील प्रशासनाला धारेवर धरले आहे. यात दंगल गर्ल फेम जायरा वसीमनं (Zaira Wasim) देखील टीका करत परख़ड मत व्यक्त केलं आहे. ती काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत. तिच्या त्या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

कर्नाटकामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीनींना हिजाब (Karnatak Hijab Row) घालण्यास मनाई करण्यात आल्यानं वाद सुरु झाला आहे. त्या वादाला हिंसक वळण लागल्याचेही दिसून आले होते. सध्या हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. यासगळ्या प्रकरणावर अभिनेत्री जायरा वसीमनं प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जायरा बॉ़लीवूडपासून लांब आहे. तिनं काही दिवसांपूर्वी आपण हे क्षेत्र सोडत असल्याचे जाहीर केले होते. तिनं इंस्टावर हिजाबबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तिनं हिजाबच्या बाजूनं आपले मत प्रदर्शित केले आहे. कर्नाटकात जे काही चालले आहे ते पाहून अस्वस्थ होते.

आपल्याला जे काही परंपरागत मिळाले आहे त्याचे रक्षण करणे हे आपले काम आहे. अशावेळी शेकडो वर्षांची परंपरा खंडित करणे बरोबर आहे का असा प्रश्न जायरानं विचारला आहे. हिजाबला विरोध करणे हे आव़डले नाही. तो एक चॉइस आहे असं म्हणणं चूकीचे आहे. हिजाब हे मुस्लिम धर्मामध्ये विकल्प नसून ती एक जबाबदारी आहे. आणि ती आपल्याला देवाकडून देण्यात आली आहे. आपण त्याच्यावर प्रेम करायला हवे. असे मला वाटते. सध्या सोशल मीडियावर जायराच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT