bollywood  Team esakal
मनोरंजन

'शुभेच्छा देताना जरा माहिती घ्या', बॉलीवूड सेलिब्रेटींची पुन्हा चूक

बॉलीवूड सेलिब्रेटींना नेमकं काय झाले हे कळायला काही मार्ग नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड सेलिब्रेटींना नेमकं काय झाले हे कळायला काही मार्ग नाही. याचे कारण म्हणजे ते चूकीची माहिती बिनधास्तपणे सोशल मीडियावर शेयर करताना दिसत आहे. काल मीराबाई चानुनं (mirabai chanu) ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं. तिनं 40 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून दिलं आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय. दुसरीकडे प्रिया मलिक नावाच्या खेळाडूनं कुस्ती क्रिडा प्रकारात यश संपादन केलं होतं. मात्र आता ती चर्चेत आली आहे ते बॉलीवूड सेलिब्रेटींच्या एका चुकीमुळे. (bollywood celebs mistakenly congratulated priya malik for winning gold medal in tokyo olympics yst88)

त्याचे झाले असे की, प्रिया मलिकनं विश्व कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. मात्र यावेळी अनेकांचा असा गैरसमज झाला की, तिनं ऑलिम्पिकमध्येच ही कामगिरी केली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. काल मिराबाई चानुनं मेडल मिळवल्यानंतर तिचं अभिनेत्री टीस्का चोप्रानं कौतूक केलं. मात्र त्यामुळे ती ट्रोलही झाली. तिनं मिराबाईच्या ऐवजी दुसऱ्याच एका खेळाडूचा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल केला होता. त्यामुळे टिस्काला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

आता ही बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी तिच चूक पुन्हा केली आहे. त्यात अभिनेत्री भूमि पेडणेकर, मिलिंद सोमण आणि वत्सल शेठ यांचा समावेश आहे. चाहत्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सुनावण्यास सुरुवातही केली आहे. त्यांनी त्या स्पर्धेचे नाव चूकीचे लिहून एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. प्रिया मलिकवर देखील आता सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. तिलाही अनेकांनी शुभेच्छा देऊन धन्यवाद दिले आहेत. यावेळी काही सेलिब्रेटींना असे वाटले की, प्रियानं यंदाच्या ऑलिम्पिकमध्येच हे यश मिळवले आहे.

milind soman
bhumi pednekar

अभिनेता मिलिंदनं व्टिट केलं होतं की, धन्यवाद प्रिया मलिक, गोल्ड टोक्यो ऑलिम्पिक. काही वेळानं मिलिंदच्या लक्षात आपली चूक आली. त्यानंतर त्यानं आपली चूक सुधारुन घेतली. दरम्यान एका युझर्सनं त्याला लिहिलं, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, थोडं गुगलं केलं असतं तरी माहिती मिळाली असती. त्यांनी व्टिट करुन पुन्हा माफीही मागितली आहे.

vatsal seth

भूमीनं देखील तिच्या इंस्टावर प्रिया मलिकचा एक फोटो शेयर केला होता. त्यात तिनं लिहिलं होतं की, बेबी गोल्ड, गोल्ड, गोल्ड प्रिया मलिक टोक्यो ऑलिम्पिक. यानंतर भूमीनं तिचं व्टिट डिलिट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT