Subhash Ghai  
मनोरंजन

Video Viral: 'खलनायक'च्या दिग्दर्शकाला पियानोचा मोह!

बॉलीवूडमधील प्रथितयश दिग्दर्शक म्हणून सुभाष घई यांचे नाव घेतले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूडमधील प्रथितयश दिग्दर्शक म्हणून सुभाष घई यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती (entertainment news) बॉलीवूडला दिल्या आहेत. ते एक यशस्वी निर्माते देखील आहेत. बॉलीवूडला उत्तमोत्तम अभिनेते देण्याचे श्रेय घई यांना जाते. त्यांचे सिनेमाचे वेगळेपण अद्याप चाहत्यांच्या मनात कायम आहे. सौदागर (Bollywood Movies) असो वा राम लखन, खलनायक असो किंवा परदेश, त्यामध्ये त्यांनी मानवी नात्यांमधील संवेदनशीलता प्रभावीपणे साकारली आहे. घई यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुभाष घई हे बॉलिवूडमधील एक आघाडीचे दिग्दर्शक. आजवर त्यांच्या अनेक कलाकृती रसिकांनी लोकप्रिय केल्या. घई सोशल मीडियावरही अतिशय सक्रिय असतात. आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातले विविध क्षण ते आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. असाच एक प्रसंग आज त्यांनी 'कू 'वर पोस्ट केला आहे. यात घई यांचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे. दिग्दर्शक असलेल्या घई यांचं संगीतप्रेम यात दिसतं आहे.

घई व्हिडिओमध्ये अतिशय सुरेख पियानो वाजवत आहेत. सोबतच त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, 'संगीत हे माझ्यासाठी नेहमीच मेडिटेशनसारखे राहिले आहे. एकतर मी तल्लीन होऊन संगीत ऐकतो, गुणगुणतो किंवा स्वतः धुन तयार करतो. सोबतच मी ध्यान करतानाही संगीत ऐकतो. तर हे आहे माझे घर, माझा पियानो! ' घई यांचे हे रूप चाहत्यांनी बेहद आवडते आहे. अनेकांनी घई यांच्या पोस्टवर विविध कमेंट्स करत पोस्ट री कू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT