मनोरंजन

'मी खादाड आहे, पॉकेटमनी त्यातच होतो खर्च': आलियाची कबूली

अनुराग कश्यपच्या मुलीनं तिचा युट्युब चॅनेल (you tube) सुरु केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anurag Kashyap daughter aaliyah ज्याच्या चित्रपटाचा बॉलीवूडमध्ये वेगळा चाहता आणि प्रेक्षकवर्ग आहे अशा अनुराग कश्यपच्या मुलीनं तिचा युट्युब चॅनेल (you tube) सुरु केला आहे. त्यावर ती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेय़र करत असते. आताही तिनं एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यामध्ये तिला एका युझर्सनं तुझा महिन्याचा खर्च किती असा प्रश्न तिला विचारला. यावर आलियानं आपले पैसे कुठे खर्च होतात याविषयी सांगितलं आहे. अनुरागला देखील आपल्या मुली विषयी चिंता आहे. तिचा असणारा पॉकेटमनी आणि ती खर्च करत असलेले पैसे यावरुन त्यानं तिला तो खर्च कमी करण्यास सांगितलं आहे. सध्या आलियाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

त्याचं झालं असं की, आलियानं तिचे स्वतचे युट्युब चॅनेल सुरु केले आहे. त्यावेळी तिला एका फॉलोअर्सनं कमेंटमध्ये विचारलं की, तुला महिन्याचा किती रुपये खर्च येतो. यावर तिनं त्या नेटकऱ्याला सांगितलं की, मला जेवढा खर्च करायचा असतो तेवढा मी करते. माझा जास्त खर्च हा कपडे आणि खाण्यावर होतो. मी आठवड्यातून दोन वेळा ऑनलाईन शॉपिंग करते. जे मला माहिती आहे की चांगले नाही. तरी देखील मी त्याच्या जास्त नादात आहे. मी जास्त खादाडपण आहे. त्यामुळे माझा त्यावर जास्त खर्च होतो आहे. मला त्यावर आता नियंत्रण आणायला हवं.

अनुराग कश्यपची (anurag kashyap) मुलगी ही सध्या कॅलिफॉर्नियामध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. ती आता सध्या ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे तिथून न्युयॉर्क आणि युरोपमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. आलियाला फॅशन मार्केटिंगमध्ये जास्त आहे. तिनं त्यावर अधिक अभ्यास केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया ही चर्चेत आली आहे. मागे एकदा तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आताही आलियानं आपल्या पॉकेटमनीचे सिक्रेट शेयर केल्यानं तिच्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT