Kiran Rao Birthday Aamir Khan esakal
मनोरंजन

Kiran Rao Birthday: लिव्ह इनमध्ये राहिले, लग्न केलं अन् 15 वर्षानतंर घटस्फोट! अशी होती किरण-आमिर लव्हस्टोरी

किरण रावचं वाढदिवस: आमिरसोबत घटस्फोटानंतर लग्न केलं अन् 15 वर्षांनतर घटस्फोट!

Vaishali Patil

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माती म्हणून आपली ओळख निर्माण करणारी किरण राव आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. एका चित्रपटाच्या सेटवर आमीरसोबत झालेल्या भेटीने तिचे आयूष्यच बदलले.

किरण बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत घटस्फोट घेतल्याने चर्चेत होती. ती आमिर खानची दुसरी पत्नी होती आणि दोघांनी घटस्फोटाची घोषणा करताच इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.

किरणचा 'लगान' हा चित्रपट तिच्यासाठी खूप महत्वाचा ठरला या चित्रपटाने तिला केवळ तिचे करिअरच नाही तर तिचा लाइफ पाटनरही दिला होता. 'लगान'च्या सेटवर ती पहिल्यांदा आमिर खानला भेटली. चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिला आमिरला सेटवर घेऊन यायची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यात बोलणे झालं आणि काही काळातच दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. त्यानंतर 2002मध्ये आमिरचा त्याची पहिली पत्नी रीनासोबत घटस्फोट झाला.

असं म्हटंल जात की त्यावेळी आमिरला खूप एकटं वाटायचे. एके दिवशी तो आणि किरण दोघेही जवळपास अर्धा तास फोनवर बोलले, त्यानंतर दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले.

आमिर आणि किरण काही काळ लिव्ह-इनमध्येही होते.आमिर खान आणि किरण राव यांनी 2005 मध्ये विवाह केला. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खुप खूश होते. लग्नानंतर या जोडप्याला सरोगसीच्या मदतीने मुलगा आझाद झाला.

दोघेही एकत्र खुप आनंदी होते. त्याच्या चाहत्यांना दोघांची जोडी आवडली पण त्यानंतर अचानक लग्नाच्या 15 वर्षानंतर किरण आणि आमिरने वेगळ होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकत्र येत घटस्फोटाची घोषणा केली. दोघांनी एक व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसोबत  शेअर केला होता. यात त्यांनी सांगितलं की, आजपासून ते फक्त मित्र आहेत. ते यापुढे पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार नाहीत. आजही दोघे अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT