Mansoor Ali Khan Pataudi & Simi Garewal Breakup Story Esakal
मनोरंजन

Mansoor Ali Khan Pataudi चा 'तो' खुलासा अन् सुन्न झाल्या होत्या सिमी ग्रेवाल..मिनटात झालं होतं ब्रेकअप..

बॉलीवूडच्या बोल्ड अभिनेत्री सिमि ग्रेवाल आणि सैफ अली खानचे वडील क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या लव्हस्टोरीनं एक काळ गाजवला आहे.

प्रणाली मोरे

Mansoor Ali Khan Pataudi & Simi Garewal Breakup:राज कपूरचा सिनेमा 'मेरा नाम जोकर' आपल्या बोल्ड सीनमुळे भलताच चर्चेत आला होता आणि ज्यामुळे सिमी ग्रेवाल हे नाव देखील प्रसिद्ध झालं.

सिमी ग्रेवाल लंडनमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्यात. वयाच्या १५ व्या वर्षी त्या आपल्या कुटुंबासोबत भारतात आल्या. त्यांनी आपल्या सबंध करिअरमध्ये आपल्या काळातल्या जवळपास अनेक बड्या निर्माता-दिग्दर्शकासोबत काम केलं आहे.

अर्थात,आपल्या करिअरपेक्षा अधिक त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. प्रसिद्ध क्रिकेटपट्टू मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबत जोडलेले त्यांचे नाव खूप चर्चेत राहिले.(Bollywood: Mansoor Ali Khan Pataudi and simi garewal love story breakup)

सिमी ग्रेवाल जेव्हा १७ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या जामनगरच्या महाराजांना डेट करत होत्या. पण काहीच वर्षात त्यांचे काहीतरी बिनसले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर सिमी यांच्या आयुष्यात सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांची एन्ट्री झाली.

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार,दोघं एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे. एवढंच नाही तर सिमी विषयी मन्सूर खूप सीरियस होते आणि तिच्याशी त्यांना लग्न करायचं होतं.

पण अचनाक पतौडी यांचे शर्मिला टागोर यांच्यावर मन जडले आणि ते एकेदिवशी तडक सिमीच्या घरी पोहोचले.

सिमीनं स्वतः दरवाजा उघडला. घरात येताच मन्सूर यांनी क्षणाचाही विलंब न करता म्हटलं,''मला माफ कर,पण मी एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो की आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते आता संपलं आहे. कारण माझ्या आयुष्यात कुणीतरी दुसरं आहे''.

पण याआधी सिमी मन्सूर यांना काही बोलणार इतक्यात ते जाण्यास उठले. जेव्हा सिमी ग्रेवाल पतौडी यांना घराच्या बाहेर सोडायला आल्या तेव्हा तिथे शर्मिला टागोर दिसल्या. त्या क्षणानंतर सिमी आणि पतौडी कायमचे वेगळे झाले. त्यानंतर मन्सूर अली खान पतौडी यांनी शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं.

ब्रेकअप नंतर सिमी ग्रेवाल यांनी मन्सूर अली खान पतौडी यांच्याविषयी मनात कटूता कधीच बाळगली नाही. लग्नानंतर मन्सूर अली खान पतौडी शर्मिला टागोर सोबत सिमी ग्रेवालचा प्रसिद्ध चॅट शो 'Rendezvous With Simi Garewal' मध्ये देखील आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT