Khuda haafiz news esakal
मनोरंजन

खुदा हाफिज 2: रिलीज डेट ठरली, विद्युत जामवालचा 'पॉवर' परफॉर्मन्स

अभिनेता विद्युत जामवालची बॉलीवूडमध्ये मोठी क्रेझ आहे. (Vidyut Jamwal) त्याचा चाहतावर्गही मोठा आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Actor: अभिनेता विद्युत जामवालची बॉलीवूडमध्ये मोठी क्रेझ आहे. (Vidyut Jamwal) त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अॅक्शन हिरो म्हणून त्याचे नाव घेतले जाते. 90 आणि 2000 (Bollywood News) च्या दशकांत बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी या अभिनेत्यांनी मोठ्या प्रमाणावर अॅक्शनपट करण्यास (Trailer Viral) सुरुवात केली होती. त्य़ाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून जे नवे अभिनेते बॉलीवूडमध्ये आले आहेत त्यामध्ये विद्युत जामवालच्या अभिनयानं अनेकांना चकित केले आहे. आशिय़ाई चित्रपट उद्योग विश्वामध्येच नव्हे तर जगभरातील प्रभावशाली अॅक्शन हिरोंच्या यादीत विद्युत जामवालचा पहिल्या दहा क्रमांकामध्ये समावेश होता.

आता विद्युत सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा खुदा हाफिज चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्युतचा काही महिन्यांपूर्वी सनक नावाचा अॅक्शनपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल काही दाखवू शकला नाही. जे विद्युतच्या अॅक्शनचे चाहते आहेत त्यांना मात्र सनकनं आगळी वेगळी पर्वणी दिली होती. विद्युत खुदा हाफिजच्या दुसऱ्या भाग़ाच्या प्रदर्शनासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.

विद्युत जामवालचा खुदा हाफिज भाग दोन हा येत्या 17 जुनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते यांनी एका पोस्टमधून ही बातमी व्हायरल केली आहे. विद्युत जामवाल बरोबरच या चित्रपटामध्ये शिवलेखा ऑबेरॉय दिसणार आहे. फारुख कबिर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्या भागामध्ये गल्फ कंट्रीमध्ये गेल्यावर विद्युतच्या पत्नीला काही गुंडाकडून किडनॅप केले जाते. तिची सुटका विद्युतनं केली असून आता पुढील भागामध्ये त्याला एका नव्या मिशनचा सामना करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT