shamshera movie news
shamshera movie news  esakal
मनोरंजन

Shamshera Trailer: याला म्हणतात ट्रेलर! शमशेराचं 'टॉलीवूड'ला आव्हान

युगंधर ताजणे

Bollywood Vs Tollywood News: टॉलीवूडच्या एकाहून एक सरस अशा चित्रपटांनी काही दिवसांपासून बॉलीवूडच्या प्रेक्षकांवर गारुड केले होते. त्याचा मोठा फटका बॉक्स ऑफिसला बसला होता. गेल्या वर्षी पुष्पापासून सुरु झालेला (Shamshera Movie Trailer) जोरदार प्रवास कमल हासन यांच्या विक्रम पर्यत आला आहे. या चित्रपटानं चारशे कोटींपर्यत कमाई केली आहे. विक्रमचा मोठा फटका बॉलीवूडच्या इतर चित्रपटांना देखील बसला आहे. त्यामुळे टॉलीवूडचा (Vikram Movie) धसका बॉलीवूडच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतल्याचे दिसून आले. यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेता रणबीर सिंग आणि संजय दत्त यांच्या शमशेराचा ट्रेलर व्हायरल झाला आणि बॉलीवूडच्या प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत (Sanjay Dutt) होता. त्याच्याकडे फारसे चित्रपट नसल्याची चर्चा होती. त्याचे गेल्या दोन ते तीन वर्षात जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याच्या शमशेराबद्दल अनेकांना कमालीची उत्सुकता आहे. आगामी काळात तो अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार आहे. सध्या चॉकलेट बॉय अशा फेममध्ये असणाऱ्या रणबीरचा शमशेरातील कडक लूक व्हायरल झाला आहे. ट्रेलरमधील त्याच्या अभियानं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

शमशेराचा ट्रेलर हा सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्याला नेटकऱ्यांनी पसंत केले आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून ज्या चित्रपटाची वाट पाहत होतो तेव्हा शमशेराच्या निमित्तानं आमच्यासमोर आला आहे. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्यांना शमशेराचा ट्रेलर आवडला आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरचा अॅक्शन थ्रिलर ब्रम्हास्त्रचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्यामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

शमशेरामध्ये रणबीरच्या अभिनयाबरोबरच संजय दत्तचा लूक आणि अभिनय यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजु नावाच्या चित्रपटामध्ये रणबीरनं काम केलं होतं. त्याची ती भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. शमशेराचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल. अशा आशावाद नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT