मध्यरात्री 'ब्रह्मास्त्र'च्या टीमची तातडीची मीटिंग! कारण ऐकाल तर...

अयान मुखर्जीचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' सिनेमा लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
'Bramhastra' Team Unit going for Urgent meeting
'Bramhastra' Team Unit going for Urgent meetingGoogle

अयान मुखर्जीच्या बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र'(Bramhastra) सिनेमाची सारेच जण चातकासारखी वाट पाहत आहे. हा सिनेमा अयान,करण जोहर(Karan Johar),आलिया(Alia Bhatt),रणबीर (Ranbir Kapoor) सर्वांसाठीच एक स्पेशल प्रोजेक्ट आहे. करण जोहर या सिनेमाचा निर्माता म्हणून,अयान सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून तर आलिया-रणबीर सिनेमातील कलाकार म्हणून या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी खूपच उत्सुक आहेत. अहं...आलिया-रणबीर फक्त कलाकार म्हणून उत्सुक आहेत 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रदर्शनासाठी असं म्हणणं चुकीचं ठरेल नाही का. कारण याच सिनेमामुळे २०१७ मध्ये हे दोघे लव्हबर्ड्स भेटले अन् त्यांच्यात प्रेम फुलू लागलं. जे म्हत्त्वाचं म्हणजे आज पाच-सहा वर्षांनंतरही टिकून आहे,तसंच अधिक बहरलेलं नात त्यांच्यात दिसून येतंय. लवकरच ते लग्न करतील अशीही खबर आहे.

'Bramhastra' Team Unit going for Urgent meeting
'कुत्र्यासोबत झोपल्यावर तो मारायचा';पूनम पांड्येचा नवऱ्याविषयी खुलासा

असो,आपण बोलत होतो मध्यरात्री 'ब्रह्मास्त्र' च्या टीमनं कोणाचं घर गाठलं आणि का याविषयी. तर आलिया,रणबीर,करण आणि अयान यांनी मध्यरात्री तडक घर गाठलं ते VFX मास्टर नमित मल्होत्रा यांचं. कारण नमित हे 'ब्रह्मास्त्र' चे निर्माते असण्या व्यतिरिक्त त्यांची VFX तंत्रज्ञानावर काम करणारी कंपनी आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील VFX वर देखील तेच काम करत आहेत. अर्थात तुम्हाला हे माहितच असेल की 'ब्रह्मास्त्र' सिनेमात VFX तंत्रज्ञान ठासून भरलेलं आहे. कारण तशी त्या सिनेमाची गरजच होती. पण आता ते परफेक्ट व्हावं,केले जाणारे प्रयोग कुठे फसू नयेत म्हणून एक शेवटचा हात त्यावरनं फिरवण्यासाठी या तातडीच्या मिटिंग घेतल्या जात असल्याचं बोललं जात आहे. या रात्रीच्या मीटिंगमध्ये हे टीममेंबर आणखी फायनल टच कसा चांगला देता येईल सिनेमाला यावर आपली क्रिएटिव्हिटी पणाला लावत आहेत असं बोललं जात आहे.

'Bramhastra' Team Unit going for Urgent meeting
रशिया-युक्रेन युद्धाशी बॉबी देओलचं नाव का जोडलं जात आहे?

'ब्रह्मास्त्र' सिनेमात रणबीर,आलिया(Alia Bhatt)सोबतच अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसच शाहरुख खानही(Shahrukh khan) पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या व्यतिरिक्त मौनी रॉय(Mouni Roy),प्रतिक, नागार्जुन,डिम्पल कपाडिया असे कलाकारही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com