Sitaram Yechury team esakal
मनोरंजन

'काश्मिर फाई्ल्स चित्रपट म्हणजे...' माकप नेते सीताराम येचुरींचं गंभीर विधान

देशात सध्या एका चित्रपटानं मोठ्या प्रमाणावर वेगळ्याच प्रकारचं वातावरण तयार केलं आहे.

सकाळ ऑनलाइन टीम

The Kashmir Files Movie: देशात सध्या एका चित्रपटानं मोठ्या प्रमाणावर वेगळ्याच प्रकारचं वातावरण तयार केलं आहे. त्या चित्रपटाचं नाव द काश्मिर (Bollywood Movies) फाईल्स असे आहे. त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotry) यांनी केलं आहे. अग्निहोत्री यांच्या काश्मिर फाईल्सला आतापर्यत सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी (Entertainment News) काश्मिरी पंडित, त्यांच्यावर झालेले अन्याय, अत्याचार आणि त्यांचे विस्थापन हा विषय हाताळण्यात आला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरुन मोठा वादही झाला आहे. सोशल मीडीयावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया काश्मिर फाईल्सवरुन व्हायरल झाल्या असून (Social Media News) त्यातून देशातील काही ठिकाणी वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत. आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी (Sitraram Yechury) यांनी काश्मिर फाईल्सवर प्रतिक्रिया दिली आहे.

येचुरी यांनी हा चित्रपट पाहिल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा चित्रपट म्हणजे देशातील सामाजिक एकता आणि अखंडता धोक्यात आणू शकतो. त्यात दाखवलेल्या अनेक मुद्दयांबाबत आक्षेप आहे. अग्निहोत्री यांनी या चित्रपटामध्ये जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबाबत आपल्याला शंका आहे. 1990 मध्ये अनेक काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. तो आकडा 89 असा सांगितला जातो. मात्र दुसऱ्या धर्माच्या लोकांची संख्या 1635 एवढी होती. हे आपल्याला कुणी सांगत नाही. चित्रपटात जशी परिस्थिती आहे तशी ती प्रत्यक्षात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देशाला धोका असल्याचेही येचुरी म्हणाले.

काश्मिर फाईल्स या चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास, हा चित्रपट 11 मार्चला जगभरात प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसांत या चित्रपटाला फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही. मात्र त्यानंतर त्याचा जो सोशल मीडियावर प्रचार झाला त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आतापर्यत या चित्रपटानं 150 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिसवर द काश्मिर फाईल्सनं विक्रमी कमाई करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय सोशल मीडियावर जे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्याचाही या चित्रपटाला फायदाच झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: कॅप्टन शुभमन गिलचे शतक! भारतीय संघाचे इंग्लंडला सडेतोड उत्तर; पायात क्रॅम्प आल्यानंतरही मैदानावर उभा राहिला

ENG-U19 vs IND-U19: १५ चेंडूंत ७८ धावांचा पाऊस! वैभव सूर्यवंशीचे शतक हुकले; इंडियाने इंग्लंडची उडवली झोप, मालिकेत आघाडी

Modi Traffic Challan : ..अन् ‘त्या’ पठ्ठ्यानं थेट मोदींनाच वाहनावरील थकीत दंड लवकर भरण्यास सांगितला!

Bacchu Kadu Interview : ''फडणवीसांच्या फोनमुळे गुवाहाटीला जाणारा बच्चू कडू नाही'' , स्वत:च सांगितलं जाण्यामागचं नेमकं कारण...

ENG-U19 vs IND-U19: ९ षटकार, ६ चौकार! वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी, थोडक्यात हुकली Century; इंग्लंडची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT