Bollywood: Muslim activist entry in Bhagwa Bikini controversy, said its chishti color Google
मनोरंजन

Deepika Padukone: 'बिकिनी भगवी नाही चिश्ती रंगाची..', आता मुस्लिम संघटना पेटल्या...

'बेशरम रंग' गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीला हिंदू संघटनांचा विरोध सुरु असताना, मुस्लिम संघटनाही हा आमच्या धर्माचा अपमान म्हणू लागल्यात.

प्रणाली मोरे

Deepika Padukone: 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरनं सुरु असलेला वाद काही थांबायचं नाव घेईना. सुरुवातीला हिंदू संघटनांनी गाण्यातील काही सीन्सवर तसंच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेत ते एडिट करण्याची मागणी केली होती. पण आता या वादात आरटीआय चे कार्यकर्ते दानिश खान यांनी उडी घेतली आहे. आता हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा पर्यंत पोहोचलं आहे.(Bollywood: Muslim activist entry in Bhagwa Bikini controversy, said its chishti color)

पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं रिलीज होऊन आता आठवडा उलटला,पण हा वाद काही थांबायचं नाव घेईना. रोज यावरनं नवं वादळ उठतंय. वेगवेगळ्या स्तरावरनं गाण्याला विरोध केला जात आहे. या गाण्यात दीपिका पदूकोण भगव्या रंगाची बिकिनी घालून शाहरुखसोबत रोमान्स करतान दिसत आहे. अनेक संघटनांना हेच खटकलं आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आणि गाण्यातील सीन्सवर आक्षेप घेत आरटीआयचे कार्यकर्ता दानिश खान हा आपल्या मुस्लिम धर्माचा देखील अपमान असल्याचं म्हणत आहेत.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

आरटीआय कार्यकर्ता दानिश खान यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत 'बेशरम रंग' गाण्याला सिनेमातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की-''ज्याला लोक 'भगवा रंग' म्हणत आहेत,तो खरंतर मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा रंग मुस्लिम समाजासाठी चिश्ति रंग आहे. तसंच, सिनेमातील या गाण्यातून देखील हिंदू-मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याचे विचार बोलून दाखवले आहेत''.

'बेशरम रंग' गाण्यावर सामाजिक संघटनांनीच नाही तर राजकीय नेत्यांनीही आक्षेप घेतला आहे. सुरुवातीला हा मुद्दा उचलून धरला ते मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी. त्यांनी मध्यप्रदेशमध्ये सिनेमा रिलीज करून दिला जाणार नाही असा सज्जड दमही भरला होता. त्यानंतर अयोध्येच्या मंहतांनी तर ज्या थिएटरमध्ये सिनेमा लागेल ते जाळून खाक केले जाईल अशी धमकीच दिली. आता हिंदू संघटनां नंतर मुस्लिम संघटनांनी विरोध करत मोठा आक्षेप गाण्यावर घेतला आहे.

'पठाण' सिनेमा २५ जानेवारी,२०२3 रोजी रिलीज होत आहे. सिनेमात शाहरुख खान सोबत दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT