Manyata Dutt and Sanjay Dutt  esakal
मनोरंजन

पती असावं तर असा! मुन्ना भाईने दाबले पत्नीचे पाय; पाहा सुंदर VIDEO

सकाळ डिजिटल टीम

संजय दत्त आणि मान्यता दत्त यांचं 2008 मध्ये लग्न झालं. या नात्यात दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि मान्यता दत्त (Manyata Dutt) हे बॉलिवूडमधील 'क्यूट' कपल्सपैकी (Bollywood Couple) एक आहे. हे जोडपं चाहत्यांना खूप आवडतं. दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि 'क्वालिटी टाइम'चे फोटो शेअर करतात. नुकतीच दोघांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं मान्यतानं एक सुंदर व्हिडिओ शेअर करत संजय दत्तला या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय-मान्यताच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण

मान्यतानं शेअर केलेल्या व्हिडिओत संजय दत्त आपल्या पत्नीच्या सेवेत गुंतलेला दिसतोय, तो आपल्या पत्नीचे पाय दाबत असून मान्यतानं विश्रांती घेतलीय. दोघंही या रोमँटिक क्षणांचा आनंद घेताना दिसताहेत. या जोडप्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडलाय. एका व्यक्तीनं लिहिलंय, खूपच अप्रतिम! संजय दत्तचं करावं तेवढं कौतुक थोडचं, तर आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय.. बाबा खूप दयाळू मनाचा आहे. लगे रहो मुन्ना भाई, असं म्हंटलंय. संजय दत्तचे चाहते मुन्ना भाईला लाडानं 'बाबा' म्हणतात.

संजय दत्त आणि मान्यता दत्त यांचं 2008 मध्ये लग्न झालं. या नात्यात दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लग्नानंतर संजय दत्तनं काही वर्षे तुरुंगात काढली; पण मान्यता दत्तनं कुटुंबाची सर्व जबाबदारी घेतली आणि आज दोघंही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वी मुन्ना भाईनं कॅन्सरविरुध्दची लढाई जिंकली असून यात त्याची पत्नी मान्यतानंही मोलाचं योगदान दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT