Taimur Ali Khan Latest Marathi News, Bollywood Latest Marathi News esakal
मनोरंजन

'नाही म्हणजे नाहीच'! पापाराझीच्या त्रासाला तैमूर वैतागला

करिना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानचा (Saif Ali khan) नवाब तैमुर (Taimur) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो.

युगंधर ताजणे

Bollywood News: करिना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानचा (Saif Ali khan) नवाब तैमुर (Taimur) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. बॉलीवूडमधील स्टार किडमध्ये सर्वाधिक पसंती ही तैमुरला मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्याचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर्सनं त्याच्या घराबाहेर गर्दी (entertainment News) केली होती. मात्र त्यानं आपला फोटो घेण्यासाठी त्या फोटोग्राफर्सला मनाई केली. सध्या तो व्हिडिओ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे (Bollywood Actor) सैफ आणि करिना यांनी तैमुरला फोटोसाठी विनंती करुन देखील त्यानं फोटो देणार नसल्याचे सांगितल्यानं त्या दोघांनाही आश्चर्य वाटले. यापूर्वी करिनानं फोटोग्राफर्सवर नाराजी व्यक्त केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. जिथे जाईल तिथे फॉलो करणाऱ्या फोटोग्राफर्सविषयी तिनं टीका केली होती. दरवेळी आमच्या प्रायव्हसीचा भंग करण्याचा अधिकार त्या फोटोग्राफर्सला दिला की काय असा प्रश्न तिनं विचारला होता. (Bollywood Latest Marathi News)

सोशल मीडियावर तैमुरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं फोटोग्राफर्सची विनंती धुडकावून लावली आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नावरुन येताना फोटोग्राफर्सनं करिना आणि सैफला फोटोसाठी विनंती केली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर तैमुरही होता. मात्र काही झालं तरी आपला फोटो घ्यायचाच नाही असा सूर तैमुरचा होता. त्यामुळे त्यानं फोटो घेऊ दिला नाही. त्यावेळी त्याला करिना - सैफनं देखील तैमुरला फोटो द्यावा म्हणून सांगितलं मात्र तरीही तो तयार नव्हता. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

फोटोग्राफर्सला नकार मिळल्यानंतर त्यांच्यात चर्चा सुरु होते. ती म्हणजे आज तैमुरचा मुड खराब आहे. तैमुरच्या गेल्या आणि नव्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर तैमुर हा नेहमीच ट्रेडिंगचा विषय असतो. सैफ करिनाच्या चाहत्यांना त्याचे फोटो पाहायला आवडतं. सैफ करिनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास करिनाचा नाताळात लाल चढ्ढा सिंग नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर सैफ विक्रम वेधा चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: सवलतीत एसटीने प्रवास करता? १ ऑगस्टपासून हा नियम माहिती नसेल तर फटका बसू शकतो

Fifa World Cup 2026 : ३ रेड कार्ड, दोन भन्नाट गोल अन् १७ वर्षांच्या पोराचे पदार्पण... मेक्सिको-दक्षिण आफ्रिका, पहिलाच सामना गाजला

Yogi Avimukteshwaranand: योगी आदित्यनाथ - अविमुक्तेश्वरानंद वाद विकोपाला; ‘शंकराचार्य’ पदवीवर प्रश्‍नचिन्ह आणि गायीच्या दर्जावरून मतभेद

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण; आज किती आहे दर?

Kolhapur Water Supply : कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

SCROLL FOR NEXT