Nora Fatehi taunts jacqueline fernandez after filing defamation case against her Esakal
मनोरंजन

Nora Fatehi: जॅकलिन विरोधात मानहानीचा दावा केल्यानंतर नोरानं आता पोस्टमधून अभिनेत्रीला झापलं, म्हणाली...

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर केस प्रकरणात जॅकलिननं उगाचच आपलं नाव गोवलं आणि आपली प्रतिमा खराब केली असा आरोप नोरानं मानहानीच्या दाव्यातून केला आहे.

प्रणाली मोरे

Nora Fatehi: गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन फर्नांडिस कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात सहआरोपी असल्यामुळे चर्चेत आली आहे. सुकेशकडून महागडे गिफ्टस आणि पैसे घेतल्याचा आणि त्याचे गुन्हे माहित असूनही ते लपवून ठेवल्याचा आरोप तिच्यावर केला गेला आहे.

मनी लॉन्ड्रिंग केस संदर्भात चौकशी दरम्यान जॅकलिनने नोरा फतेहीचं नाव देखील ईडी समोर घेतलं होतं. यामुळे नोराची देखील ईडीनं कसून चौकशी केली होती. त्यात नोरा दोषी आढळली नाही. पण जॅकलीनवर खवळली मात्र नक्कीच. आणि याचाच राग म्हणून नोराने जॅकलिनविरोधात मानहानीचा दावा केला आहे. (Nora Fatehi taunts jacqueline fernandez after filing defamation case against her)

जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर, नोरा फतेहीने तिच्या संगोपना संदर्भात आणि संस्कारांविषयी एक पोस्ट शेअर केली आहे, जी वाचल्यावर वाटतं की नोरा जणू जॅकलिनला सुनावत आहे,तिला झापत आहे. नोराने याआधी जॅकलिनवर आरोप केला होता की जॅकलिनने चुकीची माहिती ईडीला देऊन तिची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.

नोराने तिच्या संगोपनाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. नोरा फतेहीने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने तिच्या पालकांनी तिचे संगोपन कसे केले आहे याविषयी सांगताना आपण "लोकांचा गैरफायदा घेत नाही" हे आवर्जून नमूद केले आहे.

पोस्टमध्ये नोरानं म्हटलं आहे, "माझ्या पालकांनी मला लोकांचा फायदा घेण्यासाठी वाढवले ​​नाही, माझा हेतू नेहमीच शुद्ध असतो. आम्ही एकसारख्या नाही''. ही पोस्ट स्पष्ट सूचित करत आहे की यातून नोरानं जॅकलिनवर निशाणा साधला आहे.

जॅकलिन फर्नांडिसने आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:च्या हितासाठी माझे करियर आणि कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे नोरा फतेहीचे म्हणणे आहे.

12 डिसेंबर रोजी, नोराने जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता . तथापि, जॅकलिनच्या वकिलाने म्हटले आहे की,'अभिनेत्रीने नोराबद्दल सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर काहीही सांगितलेले नाही आणि त्यामुळे बदनामीचा प्रश्नच उद्भवत नाही'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT