Pathaan  Besharam Rang Controversy, Deepika Old video viral
Pathaan Besharam Rang Controversy, Deepika Old video viral Google
मनोरंजन

Pathaan: 'जे रंगात धर्म शोधतात..त्या माणसांचे मन..', दीपिकाचं हे वक्तव्य आगीत तेल ओतणार...

प्रणाली मोरे

Pathaan: शाहरुख खान,दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाचं पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यानंतर मेकर्सनी सिनेमातलं पहिलं गाणं 'बेशरम रंग' प्रदर्शित केलं आणि देशभरात खळबळ उडाली. गाण्यात दीपिका खूपच सेक्सी आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे ते तिनं परिधान केलेल्या रिवलिंग कपड्यांमुळे..आणि याच तिच्या बिकिनीनं अख्ख्या सिनेमाला अडचणीत टाकलं आहे.

देशभरातून सिनेमावर आक्षेप घेतला जात आहे. सुरवातीलाच मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं होतं की सिनेमातील सीन्स आणि ड्रेस बदलले गेले नाहीत तर आमच्या राज्यात हा सिनेमा प्रदर्शित करू दिला जाणार नाही. (Pathaan Besharam Rang Controversy, Deepika Old video viral)

यानंतर हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी दीपिकाच्या केसरी रंगाच्या बिकिनीवरनं प्रश्न उभा केला. यानंतर सोशल मीडियावर भगव्या रंगाच्या बिकिनीवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. शाहरुखचे चाहते बोलताना दिसत आहेत की याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी भगव्या रंगाचे सेक्सी कपडे घालून आयटम सॉन्ग केले आहेत मग आताच का आक्षेप घेतला जात आहे?

यादरम्यान आता दीपिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ही व्हिडीओ क्लीप तिच्या बाजीराव-मस्तानी सिनेमातील आहे. हा व्हिडीओ म्हणजे अशा लोकांवर केलेला पलटवार आहे जे रंगाला धर्माशी जोडू पाहत आहेत.

दीपिका पदूकोणच्या या व्हिडीओला शेअर करत नेटकऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'हे खरं आहे की प्रत्येक धर्मानं आपला असा एक रंग निवडला आहे,पण रंगाचा तर कोणताच धर्म नसतो,माणसाचं मन मात्र नक्कीच काळ असतं,ज्याला प्रत्येक रंगात एक धर्म दिसतो'.

बाजीराव मस्तानी सिनेमातील या व्हिडीओ क्लीपमध्ये दीपिका हाच डायलॉग बोलताना दिसत आहे. ती म्हणताना दिसते आहे की,''माता दुर्गाला सजवताना तिला हिरव्या रंगाचा चूडा घातला जातो,हिरव्या रंगाचीच शाल पांघरली जाते आणि हिरव्या रंगाचीच साडी-चोळी नेसवली जाते. दर्गामध्येही मोठ-मोठे पीर फकीरही केशरी रंगाची चादर मजारवर चढवतात,तेव्हा रंगाचा कोणीच विचार करत नाही का?''

सोशल मीडियावर सध्या 'पठाण' सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. भडकलेले नेटकरी बोलताना दिसत आहेत की या गाण्यात अश्लीलपणा दाखवला गेलाय. दीपिका पदूकोणवर देखील निशाणा साधला आहे.

देशभरातून 'पठाण'ला तीव्र विरोध होत असताना मात्र शाहरुख खानचे चाहते त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की,याआधी अनेक अभिनेत्रींनी आयटम सॉंगमधून भगव्या रंगाचे सेक्सी कपडे घातले आहेत मग आता पठाणलाच का बॉयकॉट केलं जातंय या कारणाने?

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शि होत आहे. शाहरुख याआधी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसला होता, पण त्याचा असा मोठा सिनेमा हा २०१८ साली प्रदर्शित झालेला 'झिरो' हाच म्हणता येईल. त्यामुळे ४ वर्षानंतर 'पठाण' मधून शाहरुख कमबॅक करत आहे ही चाहत्यांसाठी मोठी गोष्ट आहे. शाहरुख साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक एटलीच्या 'जवान' सिनेमातही आपल्याला दिसणार आहे. तसंच,राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' सिनेमातूनही शाहरुख काम करत आहे. सलमान खानच्या 'टायगर ३' मध्ये शाहरुख कॅमिओ साकारत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पण..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Jitendra Awhad: “सगळ्यांना पाडता मग मुलाला का निवडून आणलं नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

IPL 2024 : KKRच्या खेळाडूवर BCCIने घेतली मोठी ॲक्शन; कारवाईचे कारण अस्पष्ट पण दिली 'ही' शिक्षा

Cucumber Recipies : हेल्दी अन् टेस्टी.! कडक उन्हाळ्यात शरीराला गारवा देणाऱ्या काकडीच्या सोप्या रेसिपीज

Latest Marathi News Live Update : बराकपूरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो

SCROLL FOR NEXT