alka yagnik Esakal
मनोरंजन

Alka Yagnik यांचा 'यूट्यूब'वरही डंका! बनल्या जगातील सर्वाधिक ऐकल्या जाणार्‍या गायिका...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजाने तर सर्वांनाच वेड लावलं आहे. मग तो काळ ९० चे दशक असो किंवा आजचा काळ असो त्यांची क्रेझ अजुनही कायम आहे. त्याच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत.

आवाजाच्या जोरावर अलका याज्ञिकने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. आज त्यांनी यूट्यूबवरही राज्य केले आहे.अलका याज्ञिक या 14.8 बिलियन स्ट्रीम्ससह यूट्यूबवर सर्वाधिक ऐकलेली गेलेली गायिका बनल्या आहे.

होय, गेल्या 12 महिन्यांत अलका याज्ञिक यांची गाणी सर्वाधिक वेळा ऐकण्यात आली आहे, ज्यामुळे त्या 2022 मध्ये जगातील सर्वाधिक ऐकल्या जाणाऱ्या गायिका बनल्या आहेत.

लिबर्टी गेम्सने जारी केलेल्या आकडेवारीत अलका याज्ञिकबाबत हा खुलासा करण्यात आला आहे. लिबर्टी गेम्सने प्रत्येक देशातील शीर्ष संगीत कलाकार शोधण्यासाठी यूट्यूबवरच्या संगीत व्हिडिओ चार्टवरील प्ले करण्यात आलेल्या गाण्याच्या संख्येंचे विश्लेषण केले आणि परिणाम आश्चर्यकारक होते.

लिबर्टी गेम्सने जगभरातील चार्टवर अलका याज्ञिकचे नाव पहिले होते.गेल्या 12 महिन्यात अलका याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा ऐकण्यात आले आहे, ज्यामुळे त्या 2022 मध्ये जगातील सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या कलाकार बनल्या आहे.

या यादीत अलका याज्ञिक यांच्या व्यतिरिक्त इतर भारतीय गायकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. अरिजित सिंग, कुमार सानू आणि उदित नारायण या गायकांनीही जगातील टॉप 10 सर्वाधिक ऐकलेल्या कलाकारांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

अलका याज्ञिकच्या टॉप गाण्यांबद्दल बोलायचे तर, उदित नारायण आणि कुमार सानू सारख्या प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या त्याच्या सदाबहार गाण्यांचा समावेश आहे. तिच्या हिट लिस्टमध्ये 'मेरा दिल भी कितना पागल है', 'टिप टिप बरसा पानी', 'ए मेरे हमसफर', 'कुछ कुछ होता है' यासारख्या काही ब्लॉकबस्टर गाण्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: संदीप क्षीरसागरांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न? एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा डाव

Pune News : औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीरपणे विक्री; औषध विक्रेत्या संघटनांची बंदी घालण्याची मागणी

Eknath Shinde: विरोधकांच्या विरोधाची हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शरसंधान

Yermala News : संपूर्ण धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने प्रभावीत झाला असताना राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशी दौरा दुटप्पी पणाचा

Latest Maharashtra News Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी; केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार, काहींची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT