Bollywood: Rhea Chakraborty Shares Cryptic Post After Sushant Singh Rajput ‘Murder’ Claims Google
मनोरंजन

Sushant Singh Rajput ची हत्या झाली...या खळबळजनक दाव्यानंतर रीया चक्रव्रर्तीची पोस्ट चर्चेत; म्हणाली...

सुशांत सिंग राजपुतचं ज्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आलं तिथल्या कर्मचाऱ्यानं काही दिवसापूर्वीच अभिनेत्याची हत्या झाल्याचा दावा केला होता.

प्रणाली मोरे

Sushant Singh Rajpu : 14 जून 2020...याच दिवशी बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं निधन झालं. आता दोन वर्ष उलटली पण तरीदेखील सुशांतच्या मृत्युचं गूढ उलगडायचं नाव घेताना दिसत नाही. सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या केल्यानं झाला आहे हे समोर आलं असलं तरी त्याच्या कुटुंबाला मात्र यावर विश्वास नाही. गेल्या काही महिन्यांपासून सुशांतच्या केसमध्ये सगळंच शांत होतं. पण आता पुन्हा या केसवरनं नवीन दावे केले जात आहेत. कारण कूपर हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्यानं दावा केला आहे की अभिनेत्याचा खून झाला होता. (Shares Cryptic Post After Sushant Singh Rajput ‘Murder’ Claims)

आता हा खळबळजनक दावा केल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची क्रिप्टिक पोस्ट समोर आलेली आहे. इन्स्टा स्टोरीत तिनं ती पोस्ट शेअर करत मेसेज लिहिला आहे की-''तुम्ही जर वादळाचा सामना करताना स्वतःला त्यातून वाचवलं असेल,त्यावर विजय मिळवला असेल तर..जेव्हा जेव्हा तुमचा विश्वास डळमळीत होईल तेव्हा-तेव्हा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा''.

सुशांत आणि रिया दोघंही रिलेशनशीपमध्ये होते जेव्हा अभिनेत्यानं आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबानं रियाला दोष दिला होता,जवळपास तिला आरोपीच ठरवलं होतं. सुशांतच्या वडीलांचा आरोप होता की रियामुळेच सुशांतनं आत्महत्या केली. रिया आणि तिच्या भावावर सुशांतला ड्रग्सचं व्यसन लावण्याचा आणि त्याचा पुरवठा करण्याचा आरोप लावला गेला होता. यानंतर रियाला पोलिसांनी जेलमध्ये देखील ठेवलं होतं. कोर्टकचेऱ्या केल्यानंतर रिया जेलबाहेर आली आणि आता कुठे जाऊन तिनं नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे...तर पुन्हा सुशांतची हत्या झाली होती या नव्या धक्कादायक दाव्यानं डोकं वर काढलं आहे.

सुशांतचं पोस्टमार्टम मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये झालं होतं. आता नुकतंच त्या हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. त्यानं दावा केला आहे की सुशांतच्या बॉडीला पाहून त्याला नव्हतं वाटलं की त्यानं आत्महत्या केली असेल.

मीडियाशी बोलताना रुपकुमार शाहनं म्हटलं होतं की-''जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला होता तेव्हा कूपर हॉस्पिटलमध्ये ५ मृतदेह पोस्टमार्टमसाठी आले होते. यामधला एक VIP मृतदेह होता. जेव्हा आम्ही पोस्टमार्टम साठी गेलो तेव्हा कळलं की हा मृतदेह तर सुशांत सिंग राजपूतचा आहे''.

''त्याच्या शरीरावर खूप खूणा होत्या. गळ्यावर देखील दोन-तीन खूणा दिसून आल्या. सुशांतची बॉडी वेगळंच काहीतरी सूचित करत होती. मी माझ्या वरिष्ठाजवळ गेलो आणि म्हटलं की ही आत्महत्येची केस वाटत नाही. सुशांतच्या गळ्यावर जी खूण होती ती फासाला लटकून आत्महत्या केल्यावर जशी असते तशी वाटत नव्हती''.

Bollywood: Rhea Chakraborty Shares Cryptic Post After Sushant Singh Rajput ‘Murder’ Claims

रुपकुमार शाहनं सांगितलं होतं की माझ्या वरिष्ठानं मी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे कानाडोळा केला आणि तशी माहिती पुढे नेण्यालाही टाळलं. फक्त एवढंच म्हणाला की यासंदर्भात नंतर बोलू. रुपकुमार शाहच्या या दाव्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली होती. अभिनेत्याची बहिण श्वेता सिंग किर्ति नं रुपकुमारच्या सुरक्षेची मागणी केली होती. श्वेतानं आपलं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहना देखील टॅग केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT