Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: भाईजानच्या शोमध्ये 'पठाण' ची एंट्री...शाहरुख येणार अब्दुला घेऊन जाणार..

बिग बॉसच्या घरातील अब्दूचा प्रवास संपणार आहे पण अब्दूला घरात घेण्यासाठी येणार आहे कोणीतरी खास सेलिब्रिटीं अशी चर्चा रंगली आहे.

Vaishali Patil

बिग बॉस 16 या शो'मधील सर्वांत आवडता आणि क्यूट स्पर्धक कोण असं जर विचारलं तर, अनेकांच्या तोंडी अब्दू रोजिक हेच नाव येतं. अब्दू रोजिक. ताजिकिस्तानचा अब्दूने बिग बॉसच्या घरात येऊन आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेकांची मने जिंकली आहेत.

पण आता बिग बॉसच्या घरातील अब्दूचा प्रवास संपणार आहे पण अब्दूला घरात घेण्यासाठी येणार आहे कोणीतरी खास सेलिब्रिटीं अशी चर्चा रंगली आहे.

अब्दू रोजिकला बिग बॉस 16 मध्ये प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालं आहे. अलीकडेच, अब्दू एक टास्क पूर्ण करण्यासाठी शोच्या बाहेर गेला तेव्हा घरातील सदस्यांनी तसेच चाहत्यांनी त्याला खूप मिस केले.

सोशल मीडियावर तर अब्दूला शोमध्ये परत आणण्याची मागणी केली गेली होती. अब्दू परत आला. पण आता अब्दू रोजिक 12 जानेवारीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल. एका वर्क प्रोजेक्टसंदर्भात अब्दू बिग बॉसच्या घरातून एग्झिट घेणार असल्याचं बोललं जात आहे.

अस म्हटलं जातं आहे की 'अब्दू रोजिक 12 जानेवारीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल. अब्दू रोजिकला घरातून बाहेर काढण्यासाठी कोणीतरी खास व्यक्ती येणार या ट्विटनंतर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता ती खास व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आहे.

शाहरुख खान येणार असं ट्विटर युजर्सचं म्हणणं आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळं चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटाचा ट्रेलरही आज रिलिज झाला आहे. त्यामुळं शाहरुख खान याच शोमधूनच त्याच्या पठान चित्रपटाचे प्रमोशन सुरू करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

शाहरुख खान सलमान खानच्या शो 'बिग बॉस' मध्ये त्याच्या 'दिलवाले' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. दुसरीकडे, जर शाहरुख खान 'बिग बॉस 16' मध्ये आला आणि दीपिका पदुकोणही त्याच्यासोबत 'पठाण' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली तर तिचीही शाहरुख खानप्रमाणे ही दुसरी वेळ असेल. दीपिका पदुकोण 2017 मध्ये हॉलिवूड अभिनेता  विन डीजलसोबत तिच्या  'ट्रिपल एक्स  रिटर्न ऑफ जेंडर केज' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT