Pathaan Shah Rukh Khan Reaction
Pathaan Shah Rukh Khan Reaction esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुखचं ३२ वर्षांपासूनचं स्वप्न 'पठाण'मधून होतयं साकार...

Vaishali Patil

बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान हा त्याच्या 'पठाण' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. एकीकडे पठाण भारतात वादात आहे तर दुसरीकडे परदेशात या चित्रपटाची हवा आहे. या चित्रपटाने रिलिजपुर्वीच रेकॉर्ड केले आहेत.

आता शाहरुखने स्वत: या चित्रपटातील अनुभवांबद्दल आणि त्याच्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासाबाबत सांगितलं. त्याचा एक व्हिडिओ यशराज फिल्म्सने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

यशराज फिल्म्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान म्हणतोय की, '32 वर्षांपूर्वी मी अॅक्शन हिरो बनण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीत आलो होतो. पण, तसं काही झालं नाही आणि त्याऐवजी माझी प्रतिमा एक रोमँटिक हिरो अशी बनली. शाहरुख पुढे म्हणतो, 'मला फक्त अॅक्शन हिरो व्हायचं होतं. म्हणजे मला डीडीएलजे, राहुल आणि राजच्या भूमिकाही खूप आवडल्या. पण, मी नेहमीच अॅक्शन हिरो बनण्याचा विचार केला. त्यामुळे आता माझे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.'

'पठाण' चित्रपटातील त्याच्या रोलबद्दल बोलतांना शाहरुख खान म्हणतो, 'पठाण हा अतिशय साधा माणूस आहे आणि तो खूप अवघड गोष्टी करतो. मला वाटतं की तो खोडकर पण तितकाच कठोरही आहे, परंतु तो जास्त लोड घेत नाही . तो विश्वास ठेवतो. तो प्रामाणिक आहे आणि भारत देशाला आपली आई मानतो.'

त्याचबरोबर त्याने जॉनसोबतच्या त्याचा कामाचा अनुभवही सांगितला आणि दिपिकीचं कौतुकही केलं. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. याआधी दोघांच्या जोडीने 'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'हॅपी न्यू इयर'मध्ये धमाल केली आहे.

या चित्रपटात दीपिकाच्या उपस्थितीबद्दल शाहरुख खान म्हणतो, 'हा पुर्णपणे अ‍ॅक्शन भरलेला चित्रपट आहे. दीपिकासारख्या अभिनेत्रीची खरोखरच गरज आहे, जी 'बेशरम रंग' सारखे सीक्वेन्स तिच्या स्टाईलमध्ये करु शकते. ती जबरदस्त अ‍ॅक्शन करते. हे सर्व फक्त दीपिकाच करू शकते. 'पठाण' चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये पदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT