Indian film director Ram Gopal Varma Esakal
मनोरंजन

Ram Gopal Varma on Pathaan: 'KGF 2 चा रेकॉर्ड बॉलीवूड मोडू शकणार नाही पण' राम गोपाल वर्माचं ट्विट चर्चेत..

सकाळ डिजिटल टीम

सध्या भारतच नव्हे तर सर्वत्रच शाहरुखच्या पठाणचीच चर्चा आहे. पठाण चित्रपटाला प्रदर्शित होऊन केवळ दोनचं दिवस झाले आहे. दोन दिवसातच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड केले आहेत. अवघ्या दोन दिवसांत त्याने १२० कोटींची कमाई केली आहे.

मुंबईसह ठिकठिकाणी हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे. सध्या संपूर्ण भारतात ‘पठाण’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटावरुन अनेक कलाकारांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या. सर्वांनीच पठाणचं तोंड भरुन कौतुक केलं. आता त्यातच कंगणाची प्रतिक्रियेची चर्चा होत असतांनाच राम गोपाल वर्मा यांनीही पठाणच्या यशानंतर ट्विट केलयं. हे ट्विटनेही सर्वांचे लक्ष वेधुन घेतलं आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. राम गोपाल वर्मा यांना स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. नुकतंच राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पठाणबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

१.ओटीटीच्या काळात थिएटरचं कलेक्शन पुन्हा कधीच उत्तम होणार नाही.

२.शाहरुख हा लुप्त होत जाणारा कलाकार आहे.

३.साऊथच्या दिग्दर्शकांप्रमाणे बॉलिवूड कधीही ब्लॉकबस्टर बनवू शकत नाही.

४.KGF 2 चा ओपनिंग डे कलेक्शन रेकॉर्ड तोडण्यासाठी बॉलीवूडला अनेक वर्षे लागतील.

पठाणने वरील सर्व समज मोडून काढला आहे.

पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मुख्य भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतला. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांनाही पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : दहा तोंडी राजकारण..!

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा काहीतरी हटके! लिहून घ्या क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलडची सोपी रेसिपी

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2025

सोलापुरातील शुद्ध अन्‌ नैसर्गिक गोड पाण्याचा तलाव माहितीयं का? १५४ वर्षांचा अदिला नदीवरील एकरुख तलाव आता ‘वर्ल्ड हेरिटेज’च्या यादीत; महाराष्ट्रातील दुसरा तलाव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT